माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नेत्र तपासणी समवेत,किसान क्रेडीट कार्ड वाटप होणार

 माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नेत्र तपासणी समवेत,किसान क्रेडीट कार्ड वाटप होणार 



माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
माजगांव : ३० जानेवारी,

          माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ग्रुप ग्राम पंचायत माजगाव यांच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेत असताना एक पाउल पुढे टाकत या परिसरातील ग्रामस्थांची समर्थ नेत्रालय, मोहोपाडा यांच्या माध्यमातून मोफत डोळे तपासणी, अल्प दरात चष्मे व  मोतिबींदू शस्त्रक्रिया शिबीर तसेच शेतकरी वर्गांसाठी किसान क्रेडीट कार्ड वितरण करण्यांचा निर्णय या अभियान च्या माध्यमातून घेण्यांत आला.
           

            मानवी ज्ञानेद्रिया मध्ये असलेले डोळे हे ह्या शरिरातील महत्वाचा भाग असून या शिवाय आपण सृष्टी पाहू शकत नाही.या ग्रामस्थांना डोळ्यांची समस्या निर्माण होवू नये यासाठी कामगार संघटना नेते मच्छिंद्र पाटील आणी ग्रुप ग्राम पंचायत माजगाव यांच्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेतला.तसेच येथिल शेतकरी बांधवांस शेती विषयी येणा-या सुविधांचा लाभ मिळावा यासाठी किसान क्रेडीट कार्ड ची सुविधा निर्माण करण्यांचा निर्णय घेण्यांत आला.या वेळी दोन्ही उपक्रमाचा येथिल ग्रामस्थांनी लाभ घेतला.

            यावेळी किसान क्रेडीट कार्ड तलाठी,सरपंच दिपाली नरेश पाटील,ग्रामसेवक संदिप धारणे,मा.उप सरपंच - राजेश पाटील,सामाजिक कार्यकर्ते - नरेश पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती खालापूर - जयवंत पाटील,आर.पी.आय.रायगड जिल्हा कार्याध्यक्ष - अविनाश कांबळे,विलास कांबळे,एस.के.कांबळे,चंद्रकांत पाटील,नाथा ढवाळर तसेच डॉ.विशालाक्षी शेडबाळे (नेत्ररोग तज्ञ,कल्पेश कोळंबे,कविता पाटील,गिता माने,पोर्णिमा गायकड,अजिता गाडे,प्रियंका खडे,गायत्री पवार, उपस्थित होते


Post a Comment

0 Comments

कंपनी कामगारांना धमकावत असेल तर त्या मॕनेजमेंटला पण वठणीवर आणण्याची ताकद आमच्यात आहे -  आमदार प्रशांत ठाकुर