कोकणात राष्ट्रीय समाज पक्ष संघटना मजबूत करणार- कोकण प्रदेशाध्यक्ष भगवान ढेबे
माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : ३० जानेवारी,
कोकणात राष्ट्रीय समाज पक्षाची पक्ष संघटना मजबूत करून येणाऱ्या निवडणुकीला राष्ट्रीय समाज पक्ष सामोरे जाणार असल्याची माहिती रासपा कोकण प्रदेशाध्यक्ष भगवान ढेबे यांनी दिली आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांना मानणारा मोठा वर्ग कोकणात आणी रायगड जिल्हात आहे.मात्र त्यांनी महायुतीसोबत युती तोडून त्यांनी विधानसभा स्वबळावर लढविल्या आहेत.मात्र त्यांना पुरेसे यश आले नाही. त्यांचा एक आमदार निवडून आला आहे.त्यामुळे महादेव जानकर यांनी पुन्हा राज्यात पक्ष संघटना वाढीसाठी जोरदार प्रयत्न केले असून आपल्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.
त्यातच कोकणात राष्ट्रीय समाज पक्षाचे कोकण प्रदेशाध्यक्ष भगवान ढेबे यांनी पक्ष संघटना वाढीसाठी पदाधिकऱ्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या निवडणूका असून त्या सर्व रासप ताकतीने लढविणार असून येणाऱ्या काळात कोकणात राष्ट्रीय समाज पक्षाची संघटना वाढीसाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे कोकण प्रदेशाध्यक्ष भगवान ढेबे यांनी दिली आहे.
0 Comments