सामाजिक कार्यकर्ते मालोजी ढेबे आदर्श माता पिता पुरस्कारांने सन्मानित

 सामाजिक कार्यकर्ते मालोजी ढेबे आदर्श माता पिता पुरस्कारांने सन्मानित 



माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे 
खोपोली : ३० जानेवारी,

          रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील किल्ला गावचे रहिवासी असलेले मालोजी ढेबे यांना नुकताच पुणे येथील सुसंगत फाऊंडेशन च्या माध्यमातून शाल,श्राफळ,सन्मापत्र,सन्माचिन्ह देवून आदर्श माता-पिता पुरस्काराने सन्मानीत करण्यांत आले.
            मालोजी ढेबे यांनी अतिशय खडतर परिस्थितीवर मात करून स्वतः वन खात्यामध्ये नोकरी करून अधिकारी पद मिळवले होते.त्यानंतर त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर आणि कष्टाच्या जोरावर आपले संपूर्ण कुटुंब सुशिक्षित केले.आणि कुटुंबातील मुली आणि मुले या सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या लावून स्थैर्य प्राप्त केले.त्यांचा मुलगा एपीआय प्रसाद ढेबे हा कोकण विभागाचे आय.जी.यांचा सहाय्यक म्हणून काम पाहत आहे.अतिशय बिकट परिस्थितीमध्ये त्यांची वाटचाल करुन समाजातील आदर्शवत असेच हे कुटुंब म्हणून ओळखले जात आहे.
        त्यांना हा मिळालेला  पुरस्कार एम.के. सी.एल.चे प्रमुख विवेक सावंत आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी आणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला.यावेळी सुसंगत फाउंडेशनचे अध्यक्ष सुधाकर न्हाळदे,सचिव संगिता न्हाळदे, आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार एम.के. सी.एल.चे प्रमुख विवेक सावंत आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी आणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला.यावेळी सुसंगत फाउंडेशनचे अध्यक्ष सुधाकर न्हाळदे,सचिव संगिता न्हाळदे, आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

विक्रम गायकवाड यांस प्रेस मिडीया लाईव्ह कोल्हापूर येथे समाज रत्न पुरस्करांने सन्मानित