खालापूर शहरात जय हनुमान महिला मंडळ,व साबाई नगर महिला मंडळा कडून हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन,

 खालापूर शहरात जय हनुमान महिला मंडळ,व साबाई नगर महिला मंडळा कडून हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन,




माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
खालापूर : ३० जानेवारी 

          महिला वर्गांना विविध उपक्रमात सहभाग घेता यावे,ह्या दृष्टीकोणांतून जय हनुमान महिला मंडळ,व साबाई नगर महिला मंडळ खालापूर  यांच्या माध्यमातून हळदि कुंकवाचे आयोजन साबाई माता मंदिरात,तसेच हनुमान मंदिर येथे घेण्यांत आले.यावेळी प्रथम गणेश पुजन करुन,या मंडळाची माहिती देवून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
            आजच्या धावपळीच्या जिवनात महिला वर्ग एकत्र येणे शक्य होत नाही.मात्र हळदि कुंकू तसेच काही कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला वर्ग एकत्र आल्या.या निमित्ताने विविध खेळ जे काळाच्या पडद्याआड गेले ते खेळले गेले.तसेच विविध गाणी गाऊन महिला वर्गामध्ये उत्सहा वाढला या निमित्ताने त्यांच्या मध्ये विरंगुळा निर्माण करण्यांत आला ,तसेच या उपक्रमात नृत्य मध्ये महिला अवर्जून सहभाग घेत असल्यांचे पहावयांस मिळाले .
                  मकर संक्रांत ते रथसप्तमी पर्यंत ग्रामीण तसेच शहरी भागात हा महिला वर्गांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते.यावेळी महिला वर्गांनी मंदिरात हा कार्यक्रम हाती घेवून त्यांच्या मध्ये चैतन्य निर्माण केले.तसेच महिलांना हळदीकुंकू आणि वाण भेट वस्तू देण्यांत आली.यावेळी असंख्य महिलांना हळदीकुंकू निमित्ताने एकत्र आल्याचे पहावयांस मिळाले.

   

Post a Comment

0 Comments

माजी मंत्री महादेव जानकर यांच्या वाढदिवसाची जय्यत तयारी,१९  एप्रिल रोजी वावोशीत होणार वाढदिवस साजरा