पेण येथे धनगर समाजाच्या सभागृहाचे अनावरण ,मा. मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते
माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : १९ जानेवारी,
जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्था रायगड यांच्या वतीने धनगर समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पुण्यश्लोक (अहिल्यादेवी नगर, बोरगाव पेण ) येथे धनगर समाजाच्या सभागृहाचे अनावरण राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा मा.मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच सायंकाळी वार्षिक स्नेहसंमेलनाचे अनावरण खासदार धर्यशील पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधव आणि शालेय विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.कब्बडी संघात निवड झालली सावली सखाराम गोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी मा. मंत्री महादेव जानकर, खासदार धर्यशील पाटील, भाजपचे नेते दिनेश खैरे,नरेश शिंदे, रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते वैकुंठ पाटील, निवासी नायब तहसीलदार कालेकर, जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्थेचे रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर ढेबे, सचिव राजू आखाडे, खजिनदार सुनील कोकळे, जेष्ठ समाज सेवक दादू कोकळे,लक्ष्मण ढेबे, युवा नेते विजय उघडे, गंगाराम कोकळे, हर हर चांगभले धनगर समाज संस्थेचे अध्यक्ष ऍड संतोष आखाडे, सचिव अनंता हिरवे, माजी सरपंच नथुराम ढेबे, सरपंच सोनल उघडे, ताई रवींद्र खाकर,रासप कोकण प्रदेशाध्यक्ष भगवान ढेबे, संपत ढेबे, विठ्ठल आखाडे, युवा नेते संतोष घाटे, बबन हिरवे,रवींद्र बोडेकर, धाऊ आखाडे, हरिश्चन्द्र उघडे, शत्रुघ्न मरगळा, साखऱ्या गोरे, रामा तिवले, विठ्ठल बोडेकर, पांडुरंग ढेबे, लक्ष्मण बोडेकर, बाब्या उघडे, कृष्णा बोडेकर, राम केंडे, रामा बोडेकर, धाकल्या उघडे, घाकल्या गोरे, लक्ष्मण आखाडे, बाळू उघडे, भास्कर बावदाने, झिमा बावदाणे, आदिसह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,
0 Comments