शेतकरी,व्यक्ती,गट,संस्था यांना कृषी पुरस्कारांने होणार सन्मानित,

 शेतकरी,व्यक्ती,गट,संस्था यांना कृषी पुरस्कारांने होणार सन्मानित,तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्यांचे अवाहन 



माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
खोपोली : ६ जानेवारी,

            महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत राज्यात कृषि आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणा-या, कृषि उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरीता योगदान देणा-या शेतक-यांचा तसेच कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणा-या व्यक्ती,संस्था,गट यांना उत्तम शेतकरी म्हणून सन्मानित करण्यांत येणार आहे.
             या पुरस्काराचे स्वरुप म्हणून कृषिरत्न पुरस्कार - डॉ. पंजाबराव देशमुख,कृषिभूषण पुरस्कार - वसंतराव नाईक जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, सेंद्रीय शेती कृषिभूषण पुरस्कार, उद्याग पंडीत पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार व कृषि विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येणार आहे.
             महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत सन २०२३ या वर्षामध्ये कृषि व संलग्न क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्ती,गट,संस्था यांचे विविध कृषि पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.यामुळे कृषी पुरस्कार प्रस्ताव आपल्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यांचे अवाहन उप विभागीय कृषी अधिकारी खोपोली - सुनिल निंबाळकर,उपविभागातील खालापूर, पनवेल ,कर्जत, उरण तालुक्यातील शेतकरी आवाहन केले आहे. विविध कृषी पुरस्कार प्रदान तयार करणे कामी अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करण्यांचे अवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले. 

Post a Comment

0 Comments

अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य -  प्रा.मायाप्पा बुधे