अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य - प्रा.मायाप्पा बुधे
माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : ६ जानेवारी,
अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत.दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप करुन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.असे प्रतिपादन प्रा.बुधे यांनी व्यक्त केले.यावेळी एम.एस.पी फौंडेशन द हॅप्पी क्लासरुम या शाळेच्या विद्यार्थ्यांना अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे वतीने राजिप शाळा अंबवडे ता. खटाव जि.सातारा या शाळेतील ५४ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी प्रा.बुधे म्हणाले की डोंगर दर्या खोऱ्यातील विद्यार्थ्यांच्या बारा महिने दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांच्या पाठीवर हात ठेवला आहे.त्याबद्दल मी प्रवीण काकडे यांचे आभारी आहोत.त्याचं कार्य नक्कीच बहुजन समाजाला दिशादर्शक ठरेल.आज पर्यंत कित्येक विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी आर्थिक मदत व शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणे काळजी गरज आहे.
शिक्षणाशिवाय पर्याय नाही अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टने हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणले आहे.त्यांनी शाळेला शैक्षणिक साहित्य वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे
यावेळी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया धनगर समाज महासंघ प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ.एस.बी.पाटील गोडसे महविद्यालय वडुज व दहिवडी काॅलेजचे उपप्राचार्य डॉ.ए एन.दडस व उपप्राचार्य वडुजचे उपप्राचार्य साबळे,प्राचार्य डॉ.एस.बी.पाटील,उपप्राचार्य दडस प्रा प्रवीण काकडे यांची भाषणे झाली.तर प्रसंगी संस्थेच्या सचिव प्राध्यापक पुनम बुधे, अध्यक्ष संदीप वावरे काशिनाथ बुधे, प्राध्यापक शितल काकडे, मोहनराव बुधे, हणमंतराव देशमुख, निवासराव भोकरे, अधिकराव पिंगळे,राहुल कोळी, प्रमोद बर्गे, प्रस्ताविक शिवम डोंबे यांनी केले.आभार प्रदर्शन कुलकर्णी मॅडम यांनी मांडले.
0 Comments