भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुधीरशेठ ठोंबरे यांच्या अभिष्ठचिंतन च्या निमित्ताने स्तुत्य उपक्रमाचे आयोजन
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
खालापूर : १ जानेवारी,
हिंदु संस्कृती मध्ये गाईला खूप महत्व असून तीचे दर्शन घेतल्यास मनोकामना पुर्ण होत असतात.तिच्या मध्ये असलेल्या दैव - दैवतांचा निवासामुळे आपल्या वाढदिवसाची सुरुवात करावी या उद्दात विचारांतून भक्ती वेदांत गोआश्रम चॅरीटेबल ट्रस्ट नानीवली ( चौक ) येथे जाऊन गो मातेच पूजन करून त्यांस खाद्य भरविण्यांत आले.
त्याच बरोबर या राजिप शाळा वनखल वाडी येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांस खावू वाटप करण्यांत आला.८० टक्के समाज कारण आणी २० टक्के राजकारण हे तत्व मनाशी बाळगून चौक,रसायनी परिसरात गरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जात असलेले तसेच अपघातग्रस्तांना मदत,होतकरू विद्यार्थ्यांस, गरजू कुटुंबांना मदतीसाठी कायम तत्पर असलेले सुधीर शेठ यांचा चौक परिसरात नावलौकिक आहे.भारतीय जनता पार्टी मध्ये काम करीत असतांना आज संपुर्ण चौक त्यांच्या अधिपत्या खाली असून सरपंच सुद्धा बीजेपी चा असल्यांचे पहावयास मिळत आहे.
यावेळी स्मिता ठोंबरे, जानव्ही ठोंबरे, दिपक ठाकूर - शिक्षक,यशवंत बिराजदार,शांताराम तवले, योगेश थले,चंद्रकांत पवार, खुर्शीद विजय देशमुख, बाळू भालसिंग ,आदी उपस्थित होते.
0 Comments