पेण येथे स्वप्नपूर्ती मेन्स वेअर दुकानाचे अनावरण,विजय उघडे यांची व्यवसायात यशस्वी वाटचाल
माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : ३ जानेवारी,
युवा उद्योजक विजय रामा उघडे यांनी नुकताच पेण येथे स्वप्नपूर्ती मेन्स वेअर ह्या कापडाचे दुकानाचे अनावरण करून उद्योग क्षेत्रात यशस्वी रित्या एक पाउल पुढे टाकले असून जेष्ठ समाजसेवक कोंडू धोंडू उघडे यांच्या हस्ते या दुकानाचे अनावरण करण्यात आले.
पेण येथे राहणारे विजय उघडे हे धनगर समाजाचे तरुण व उभारते, नेतृत्व असून करीत ते आता एलएलबीचे शिक्षण घेत आहे.मात्र तरुणांनी सुद्धा व्यवसायात उतरले पाहिजे हे उदिष्टे डोळ्यासमोर ठेवून कापड्याचे दुकान टाकून उद्योग क्षेत्रात यशस्वी पाऊल टाकले आहे.स्वप्नपूर्ती मेन्स वेअर हे दुकान शिक्षक सोसायटी कौडाळ तलाव समोर पेण, रायगड येथे आहे.
यावेळी वडील रामा भगवान उघडे, आई ताई रामा उघडे, सचिन उघडे , कोंडाजी उघडे, संजय तिवले ,राहुल कोकरे ,पेण तालुका धनगर समाज नेते विठ्ठलबुवा बोडेकर , लक्ष्मण मरगळा ,राजू आखाडे , रवींद्र बोडेकर ,रामा तिवले, हरिचंद्र उघडे , पांडुरंग ढेबे ,झिमा आखाडे, मा. सरपंच जनार्धन भस्मा ,ऍड जयेश पवार, बळीराम पाटील, मयुरेश जोशी, युवा नेते महेश भिकावले मा. पंचायत समिती सदस्य निळकंड दिवेकर ,गणेश खाकर ,वामन उघडे , प्रदीप जाधव , नरेश मरगळा ,विठ्ठल मरगला ,महादेव ठाकरे ,जोमा ठाकरे ,राकेश पिंगळा ,विलास कोकले ,वरुण आखाडे , आदिसह अनेक समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते
0 Comments