क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप....
ॲड.आकाश सोनवणे यांचा स्तुत्य उपक्रम....
माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : ६ जानेवारी,
प्रथम शिक्षिका स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती साजरी करण्यात आली.या निमित्ताने निमित्ताने मोहनवाडी येथील बालवाडीतील लहान मुलांना सामाजिक कार्यकर्ते,ॲड.आकाश सोनावणे यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य व खेळाच्या वस्तूं व खाऊचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला नालंदा बुद्ध विहार समिती अध्यक्ष उत्तम पवार ,भा.बौ.महासभा वॉर्ड शाखा अध्यक्ष विजय सताणे, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक,कैलासजी मोरे, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक प्रकाश पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुरज गायकवाड व स्वप्नील शिंदे, मनोज केदारी,संचिता वायदंडे आदी मान्यवर उपस्थित होते.मोहन वाडी बालवाडी शिक्षिका अनिता प्र.मोरे व पद्ममीनी स्वमीनाथ गायतोंडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.तर सम्यक मित्रमंडळाचे अध्यक्ष नयन या.गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
0 Comments