तळा बसस्थानकाच्या कामाला मुहुर्त कधी सापडणार?

 तळा बसस्थानकाच्या कामाला मुहुर्त कधी  सापडणार? 

  


माय मराठी न्युज : कृष्णा भोसले
तळा : २५ जानेवारी 
 
            तळा तालुक्यातील एकमेव छोटेसे असणाऱ्या मात्र तालुक्यातील सर्व गावाला जोडणा-या  बसस्थानकाच्या कामाला सुरवात करण्यांसाठी मुहुर्त कधी सापडणार असा सवाल नागरीकांच्या वतीने केला जात आहे. 
            ना. अदिती तटकरे यांच्या हस्ते या कामाचा भुमिपुजन १४ ऑगस्ट  २०२४  ला झाले या कामाला १  कोटी ७१  लाख रुपये निधी मंजूर असून पहिला हप्ता ७६ लाख रुपये वर्ग झाल्याची माहिती मिळते.परंतु या कामाकडे संबधित ठेकेदार कामाला सुरुवात करत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.या स्थानकांच्या आजुबाजूच्या भिंती,लघुशंका ची दुरावस्था झाली.शौचालयाचा तर पत्ता च नसल्याने नागरीकाकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. 
           पर्यटनातून तालुक्यातील विकास साधण्याच्या गेल्या २५ वर्षे राज्यकर्ते घोषणा देत असतात.परंतु ना पर्यटन विकास झाला ना रोजगार मिळाला अशी स्थिती निर्माण झाली आहे.अशा या राज्य व केन्द्र सरकारच्या सत्तेत असुनही तालुक्यातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या या आमदार खासदार नामदार सत्तेत असलेल्या छोट्या तालुक्यातील या बसस्थानकाची दुरावस्था खुप मनाला वेदना देणारी ठरत आहे.
                   याकडे गांभीर्याने का पाहीले जात नाही हिच शोकांतिका आहे. तालुक्यातील तळगड किल्ला, कुडे लेणी, गायमुख तळेगाव ची मंदिरे, श्री चंडिका माता मंदीर अशी पर्यटनस्थळे असुनही बाजारपेठ पर्यटक रस्ता आणि अरूंद व नादुरूस्त बसस्थानक यामुळे आत सहसा कुणी येण्यासाठी तयार नाहीत. त्यामुळे या बसस्थानकाच्या कामाला लवकरच सुरवात होऊन ते काम सुद्धा उत्कृष्ट दर्जाचे व्हावे अशी मागणी तळेवासीयांचे वतीने होत आहे.

Post a Comment

0 Comments

लेकलँण्ड केमिकल्स कंपनीत स्थानिकांना कायमस्वरुपी कामावर घ्या - माडप आदिवासी, ठाकूरवाडीतील तरूणांची मागणी