अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टने कोकरे कुटुंबीयांची चार मुले दत्तक...
सामाजिक बांधिलकी जपत दिला कोकरे कुटूंबियांना दिला आर्थिक मदतीचा हात.
माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : ८ जानेवारी,
अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टने दिघे वस्तीतील गरीब कुटूंबातील चार मुले दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च करणार असल्यामुळे कोकरे कुटूंबाला चांगला मदतीचा हात मिळाला आहे.
सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कोकरे हे दिघे वस्तीतील तालुका राजगड जिल्हा पुणे येथील रहिवासी असून.सामाजिक क्षेत्रामध्ये मोठी पक्कड असल्यामुळे एका सामाजिक कामासाठी गेले असता त्यांच्या डोक्यात दुखायला लागले व काही काळानंतर त्यांच्या डोक्यामध्ये रक्तस्राव झाला आणि ते बेशुद्ध पडले त्यांना हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन करण्यांत आले.या मध्ये त्यांची अर्थिक मोठ्या प्रमाणांत खर्च झाले.डॉक्टरांनी त्यांना किमान चार ते पाच वर्ष कोणतेही काम धंदा आणि प्रवास करायचा टाळण्यांस सांगितले.
कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य झाले.त्यांना दोन मुले असून ते शिक्षण घेत आहेत दवाखान्याचा खर्च व शैक्षणिक खर्च भागवणे मुश्किल झाले.गेल्या तीन वर्षांपूर्वी त्यांचे बंधू नवनाथ कोकरे यांचेही निधन झाले असून त्यांनाही दोन्ही मुले आहेत.त्यांच्याही कुटुंबाची बऱ्यापैकी जबाबदारी हे उचलत होते.परंतु त्यांच्या ऑपरेशन मुळे दोन्ही कुटुंबाचा खर्च भागवणे अवघड झाले असल्यामुळे अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टने तुकाराम कोकरे यांची दोन्ही मुले व नवनाथ कोकरे यांची दोन्ही मुले दत्तक घेऊन त्यांना नुकताच पुणे येथे त्यांच्या कुटूंबियांना दहा हजारांचा धनादेश दिला, व वह्या देऊन चारही मुलांची शिक्षणाची जबाबदारी अहिल्यादेवी ट्रस्टने घेतली आहे.
तुकाराम कोकरे पूर्णपणे बरे होत नाहीत तोपर्यंत त्यांच्या कोकरे कुटुंबीयांच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी अहिल्यादेवी ट्रस्ट घेईल अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीणजी काकडे यांनी दिली. तुकाराम कोकरे हे नेहमी समाजासाठी प्रामाणिक काम करत असून त्यांच्या कुटूंबावर अशी वेळ आल्याने त्यांना आता मदतीची गरज असल्याने प्रवीण काकडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक हात मदतीचा दिला आहे,यावेळी अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीणजी काकडे, प्राध्यापिका शितल काकडे व, सुरेखा कोकरे व कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.
0 Comments