रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री महाराष्ट्र राज्य भरतशेठ गोगावले,तळा शेतकरी संघटनेनी घेतली भेट,
माय मराठी न्युज : कृष्णा भोसले
तळा : २५ जानेवारी,
रोजगार हमी,फलोत्पादन,खारभूमी मनरेगा बाबत येणाऱ्या अडचणी,जुन्या कामांचे पैसे वितरित व्हावे नवीन कामांना गती मिळावी.यासाठी तळा शेतकरी संघटनेनी,रोजगार हमी व रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री महाराष्ट्र राज्य भरतशेठ गोगावले यांची भेट घेतली.तसेच निवेदन देऊन त्यांना या बाबत तळा तालुक्याचा आढावा घ्यावा.ही विनंती करण्यात आली.या कार्यक्रमा निमित्ताने आलेल्या शेतकऱ्यांचे आपुलकीने विचारपूस केली. तसेच जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी शेतकऱ्यांना अल्प हार देण्यांत आला.
निवेदन देण्यासाठी तळा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आता नक्कीच रोजगार हमीच्या कामांना गती मिळेल. याचा फायदा सर्व सामान्य शेतकऱ्यांना,तरुणांना होईल.अशी आशा संघटनेला झाली आहे.शेतकरी संघटनेने निवेदन देऊन रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री महाराष्ट्र राज्य भरतशेठ गोगावले यांचे समोर मांडले याबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून याबाबत माहिती घेऊन आपल्याला न्याय दिला जाईल असे आश्वासन दिले.
शेतकरी बांधवांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी शेतकरी संघटनेचे सचिव कैलास पायगुडे.नितीन साळवी,पत्रकार संजय रिकामे,खेळू वाजे,नामदेव साळवी ,आर्डे, संतोष आमले,साळवी मामा,वैभव कदम, भगवान शिंदे,तळेगावचे मुंबई अध्यक्ष,सूचित पतारी, लक्ष्मण तांबे,गजानन वारे. कानू पिंगळे,नामदेव पवार,गंगाराम कोळी,प्रभाकर मांगले, शांताराम पोरे,आदी शेतकरी
मोठ्या संख्येने हजर होते.
0 Comments