महडच्या अष्टविनायक मंदिरात गणेश जन्मोत्सव,जिल्हाधिकारी जावळे सहपत्नी समवेत पुजा,उत्सवात रांगोळीची भर
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
महड : १ फेब्रुवारी,
मुंबई -पुणे महामार्गावर असलेले अष्टविनायका पैकी महड गावातील वरद विनायक येथे माघी गणपती उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.या ठिकाणी सुंदर आशी रांगोळी काढण्यांत आली असून पहाटे जिल्हाधिकारी जावळे सह पत्नी समवेत पुजा संपन्न झाली.सकाळी किर्तनांचे आयोजन करण्यात आले आपल्या सुमधुर वाणीमधून ह.भ.प.चारुदत्त महाराज आफळे यांनी सुसाव्य असे किर्तन करुन गणेश भक्तांस मंत्र मुग्ध केले.
या उत्सवाच्या निमित्ताने चार दिवस कथक,महिला ग्रामस्थांसाठी पैठणीचा खेळ,सिने अभिनेत्री यांचा ही सहभाग असणार आहे.त्याच बरोबर घर बसल्या दर्शन ऑनलाईन युटुब चॅनेल थेट प्रसारण होत आहे.येणा-या गणेश भक्तांस ५ दिवस विनामुल्य रिक्षा,शुद्ध पिण्यांचे पाणी,त्याच बरोबर पोलीस प्रशासन चे मोलाचे सहकार्य लाभत आहे.असे अनेक उपक्रम सुरु असल्यांची माहिती ॲड.कार्याध्यक्ष मोहिनी वैद्य यावेळी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
या ठिकाणी भव्य दिव्य अशी रांगोळी ( वरद विनायक फुल रांगोळी मंडळ ) रवि आचार्य -नेरळ मंगेश देशमुख- माणकीवली तुळशिराम ठोंबरे- टेंभरी सचिन पाटील-कलोते, जिवन ठोंबरे,भरत ठोंबरे,पियूष पाटिल,अजय ठोंबरे,नंदिनी ठोंबरे,सोनम पाटिल,साक्षी ठोंबरे,स्वरा पाटिल,आदी कलाकारांनी रांगोळी काढण्यासाठी ८० किलो कणीचा वापर करण्यात आला.साबुदाणे १० कि.तीळ - २ कि.मणी २ कि.विविध कलर्स ४८ तास कालावधी लागला.असे व्यवस्थापक अतुल तट्टू यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
0 Comments