किशोर पवार सलग चौथ्यांदा पाणी पुरवठा सभापती, उज्ज्वला पवार बांधकाम सभापती पदि बिनविरोध निवड
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
खालापूर : २ फेब्रुवारी,
खालापूर नगर पंचायत मध्ये सभापती पदाची निवडणूक प्रकाश सकपाळ,पिठासिन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व प्रभारी मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यावेळ रिक्त झालेल्या जागेसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली.मात्र कोणतेही अर्ज दाखल न झाल्यांने किशोर पवार यांची सलग चौथ्यांदा पाणी पुरवठा सभापती पदि बिनविरोध निवड झाली तर उज्ज्वला किशोर निधी यांची बांधकाम सभापती पदि बिनविरोध निवड झाली.
नगर पंचायत मध्ये शिवसेना शिंदे गटाची सत्ता असून आमदर महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून निवड झाल्यांचे समजते.त्यांची निवड झाल्यांचे कळताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.यावेळी नगराध्यक्षा रोषणा मोढवे, उपनगराध्यक्ष संतोष जंगम, नगरसेविका लता लोते, सुनीता पाटील ,नगरसेवक महेश जाधव, गोपी शहा, निशांत पाटील, दिनेश फराट , स्वीकृत नगरसेविका शिवानी जंगम व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.दोघांची बिनविरोध निवड झाल्यामुळे कार्यकर्ते यांचा उत्साह वेगळाच अनुभवला मिळाला.
.jpg)

0 Comments