भागवत धर्म सेवा प्रतिष्ठान,महड येथे बालसंस्कार शिबिराचे आयोजन

 भागवत धर्म सेवा प्रतिष्ठान,महड येथे बालसंस्कार शिबिराचे आयोजन 




माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
महड  : १७  मे, 
  
              बालमनाला चांगले संस्कार व्हावे,त्यांच्या मध्ये  व्यक्तिमत्व विकासाची जडणघडण व्हावे,त्याच बरोबर  वाचन संस्कृती रुजली जावी,विविध कलाशैलीचे ज्ञान  त्यांच्यामध्ये निर्माण होवून एक उत्तम सुजाण नागरिक  घडावा या उद्देशाने गेले अनेक वर्ष ह.भ.प.रामदास भाई  महाराज पाटील संस्थापक, अध्यक्ष आध्यात्मिक शिक्षण संस्था (गुरुकुल  महड येथे भागवत धर्म सेवा प्रतिष्ठान,येथे बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यांत आले आहे.
           शाळेय शिक्षण घेत असतांना आपले मन वारकरी सांप्रदायाकडे च्या भक्ती मार्गाकडे वळावे यासाठी भाई महाराज यांनी गुरुकुल संस्था ची स्थापन करुन लहान वयातच मुलांच्यावरती संस्कारांचे बीजे कोरली जात आहे.गितापाठ ,हरीपाठ,नापजप यज्ञ,भजन ,पकवाद,विना,टाळ,हार्मोनियम असे वाद्य या ठिकाणी या मुलांना शिकवली जात आहे.यामुळे ही मुले आवडीने शिक्षण घेत आहे.असल्यांचे या ठिकाणी पहावयांस मिळत आहे.
          त्याच बरोबर येथिल परिसर रमनिय असल्यामुळे लहान मुलांचे मन भक्तीमार्गाकडे वळले जात आहे.या ठिकाणी मुले राहत असून त्यांच्या जिवनाश्यक गरजा या ठिकाणी पुर्ण होत असतात.शिवाय शाळेय शिक्षण घेवून आध्यामिक भक्तीमार्गाकडे मन कसे वळवावे यांचे ज्ञान या ठिकाणी दिले जाते.या संस्कार शिबीरात ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पाटील यांचे मोठे योगदान लाभत आहे.

       


Post a Comment

0 Comments

संतोष शिंगाडे यांना आरडीसी बॅंक च्या वतीने जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहिर