युवा नेते संतोष घाटे यांचा वाढदिवस साजरा,अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून दिल्या शुभेच्छा
माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : १५ मे ,
ऑल इंडिया धनगर धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य, तसेच खडई गावाचे युवा नेते संतोष घाटे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून त्यांना दिर्घ आयुष्यासाठी खूप,खूप शुभेच्छा दिल्या,
खालापूर तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या खडई गावाचे संतोष घाटे हे रहिवासी असून या भागात त्यांचे समाजासाठी मोलाचे योगदान आहे.या गावात आजही रस्ता, पाण्याची मूलभूत सुविधा नाहीत, या गावात रस्ता आणि पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी अनेकवेळा आंदोलन मोर्चे काढले समाजाला न्याय देण्यासाठी, तसेच ऑल इंडिया धनगर समजाच्या माध्यमातून त्यांनी अनेक गोरगरिबांना मदत करीत असतात.
राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांचे ते एकनिष्ठ कार्यकर्ते असून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या माध्यमातूनही ते राजकारणात सक्रिय झाले.त्यांचा नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी ऑल इंडिया धनगर समाजाचे कोकण संपर्क प्रमुख रामचंद्र पुकळे, रायगड जिल्हा प्रभारी अध्यक्ष आनंदराव कचरे,रायगड जिल्हाध्यक्ष प्रकाश उघडे,खाणाव ग्रामपंचायत सदस्य प्रकाश होगाडे,सुनील घाटे, प्रदीप घाटे, दिलीप गोरे, सचिन हिरवे, आदिसह अनेक महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments