खालापूर पोलीस ठाणे जपतोय सामाजिक बांधिलकी - १० हजार वह्यासह ५०० विद्यार्थ्यांना केले गणवेश वाटप
पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या कामगिरीचे होते सर्वत्र कौतुक
माय मराठी न्युज : समाधान दिसले
खालापूर : ७ फेब्रुवारी,
ज्या विद्यार्थ्यांची शिकण्याची आवड आहे, परंतु त्यांच्या आर्थिक परिस्थिती नाही अशा विद्यार्थ्यांना मदत म्हणून खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार सचिन पवार यांनी स्वखर्चातून शिक्षणाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत १० हजार वह्यासह ५०० गणवेश वाटप करत अनोखा उपक्रम हाती घेतल्याने खालापूर पोलीस ठाण्याच्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महिला व बाल अत्याचार संदर्भात घटना घडत असून त्या आळा घालण्यासाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक असलेले व्ह्या विद्यार्थ्याला देण्यात आली आहे. सदर नोटबुक चे मुखपृष्ठावर डायल ११२, चाइल्ड हेल्पलाइन नंबर १०९८ , सायबर क्राईम तक्रारी संदर्भात १९३० व सायबर वेबसाईट यांची माहिती तसेच महिलांसाठी विशेष हेल्पलाइन नंबर आणि पाठीमागील पृष्ठावर खालापूर पोलीस ठाणे येथे कार्यरत पोलीस काका - पोलीस दीदी यांचे फोटो नाव व संपर्क क्रमांक नमूद केलेले आहेत.याचा फायदा केवल विद्यार्थ्यांना नाहीतर त्यांचे घरातील नातेवाईक व शिक्षक यांना होणार असल्याने पोलिस निरीक्षक सचिन पवार व त्यांच्या सर्व स्टाफच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
खाकी वर्दी म्हणलं की, अनेकांमध्ये भीती असते. परंतु खाकी वर्दीमध्येही देव माणूस दडलेला असतो याचे अनेक उदाहरणातून पाहायला मिळाले असता या खाकी वर्दीतील देव माणसाचा पुन्हा प्रत्यय खालापूर पोलीस ठाण्यात येऊ लागला असून खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने गोरगरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये जवळपास दहा हजारहून अधिक वह्याचे वाटप करीत ५०० गणवेश वाटप केल्याने या पोलीस बांधवांच्या सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून विद्यार्थिनी चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला आहे.
0 Comments