पालकांच्या मदतीला लायन्स क्लब चा हात,विद्यार्थ्यांस शैक्षणिक साहित्य वाटप
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
माजगाव / आंबिवली : ७ फेब्रुवारी,
लायन्स क्लब सातत्याने विविध उपक्रम हाती घेत असतांना एक एक पाऊल पुढे टाकत ग्रामीण भागातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची कोणतीही कमतरता भासू नये या उदात्त विचारातून लायन्स क्लब यांनी रायगड जिल्हा परिषद शाळा माजगाव व पौध वाडी या शाळेतील शंभर विद्यार्थ्यांस शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. पालकांच्या मदतीला लायन्स क्लब चा हात असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्मिथ हास्य झलकल्याचे पहावयास मिळाले.
शाळेमध्ये येत असताना महत्त्वाचं वस्तू म्हणजे दप्तर आणि त्यामधील लागणारे साहित्य हे महत्त्वाचं असून या माध्यमातून शंभर विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आली.हे उपक्रम खजिनदार प्रोजेक्ट हेड - किशोर पाटील,अध्यक्षा - शिवानी जंगम,जीएसटी - लायन विजय गणात्रा,ग्रुप ग्राम पंचायत माजगाव सरपंच दिपाली नरेश पाटील,ज्योती देशमाने,नागेश देशमाने,नितीन महाब्दी,यशवंत शिंदे, विलास कांबळे, नरेश पाटील, सूर्यकांत कांबळे,सुरेश पाटील, रवींद्र पाटील, प्रदिप पाटील, मुख्याध्यापक किरण कवाद,शिक्षका - रेखा जाधव,भुषण पिंगळे पाटील मॅडम अदि शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments