शाळेच्या दुरुस्तीसाठी आमदार निरंजन डावखरे यांस निवेदन,
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
खालापूर : ९ फेब्रुवार,
ग्रामीण भागातील जिल्हा परीषद शाळेकडे दुर्लक्ष झाले असून पावसाळ्यात अनेक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.त्याच बरोबर सोयीसुविधा यांचा वनवा दिसत असून आपल्या माध्यमातून दुरस्ती व सोयीसुविधा साठी निधी उपलब्ध करावा यासाठी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांची बीजेपी खालापूर तालुका तालुका मंडळ अध्यक्ष सनी यादव व कार्यकर्ते यांनी भेट घेवून तालुक्यातील असलेल्या शाळेच्या समस्या पाढा वाचला.
यावेळी आमदार यांनी निवेदन स्विकारुन तालुक्यातील ग्रामीण भागातील असलेल्या राजिप शाळेच्या दुरवस्था संदर्भात चर्चा करण्यांत आली. लवकरात - लवकर ज्या ठिकाणी शाळेच्या समस्या असतील तेथे लक्ष्य वेधले जाईल.असे आश्वासन उपस्थित बीजेपी कार्यकर्ते यांना दिले.
यावेळी खालापूर तालुका मंडळ अध्यक्ष सनी यादव, खालापूर तालुका सरचिटणीस रवींद्र पाटील, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष नागेश पाटील, खालापूर शहर अध्यक्ष दिपक जगताप,वाहतूक सेल अध्यक्ष हरीभाऊ जाधव, मोहन घाडगे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित यावेळी उपस्थित होते.
0 Comments