महेश निमणे यांस खोपोलीचा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

 महेश निमणे यांस खोपोलीचा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित 

 



माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
खोपोली :  ११ फेब्रुवारी,

          

               सुखी वास्तु स्पिरिचुअल सर्व्हिसेस महेश निमणे हे  वास्तु शास्त्राच्या या क्षेत्रात गुढ विज्ञान,अंकशास्त्र , रेकी,लोलक शास्त्र, यात प्राविण्य मिळवलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्या कडे पाहिले जात असतांना आजवर त्यांने अनेक कुटुंब सुखी समाधानी केले आहेत.आपल्या कडे असलेल्या या ज्ञानांचा वापर जनकल्यांसाठी करीत असून त्याच बरोबर रक्तदान,शाळा डिजिटल करुन सामाजिक बांधिलकी जोपासण्यांचे काम केले.यामुळे  बुज हास्य क्लब संस्थेच्या २३ व्या वर्धापन दिनांचे औचित्य  साधत, महेश निमणे यांस खोपोलीचा पद्मश्री पुरस्कार आमदार महेंद्रशेठ थोरवे ,केंद्रीय उद्योग मंत्री उदय सामंत ही उपस्थित सन्मानचिपत्र देवून गौरविण्यांत आले.                                                          बुज हास्य क्लब  'आरोग्यम धनसंपदा' हसा आणि निरोगी रहा ह्या विचारांचा समाजात प्रसार करून लोकांचे आरोग्य जपण्यासाठी अविरत कार्यरत प्रयत्न करीत असून सामाजिक,शैक्षणिक,आध्यत्मिक,      व्यवसायिक,वैद्यकीय, कला व क्रीडा इ.क्षेत्रामध्ये उल्लेखनिय काम करीत असलेल्या व्यक्तीचा यावेळी सन्मानित करण्यांत आले.
               संस्थेचे  संस्थापक बाबुभाई ओसवाल, 
सावित्री जाधव,विजय घोसाळकर,संतोष वाघ,हेमंत नांदे,रोहिदास गुरव,गणेशकर सर  व हास्य क्लब च्या सर्व सभासदांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.या सोहळ्यास कोमसा परिषद सर्व सभासद उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमाचे सुत्र संचालन शोभा धायगुडे यांनी केले.
             


Post a Comment

0 Comments

विक्रम गायकवाड यांच्या अभिष्ठचिंतनास प्रितम म्हात्रे यांची उपस्थिती,भावी सरपंच म्हणून कार्यकर्ते यांची ललकारी