थरमॅक्स चे १६ कामगार पुन्हा उपोसणार आमरण उपोषणचे हत्यार,व्यवस्थापक यांनी खोटे आश्वासन देवून कामगारांची केली दिशा भूल

 थरमॅक्स चे १६ कामगार पुन्हा उपोसणार आमरण उपोषणचे  हत्यार,व्यवस्थापक यांनी खोटे आश्वासन देवून कामगारांची केली दिशा भूल





माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
पौध : १३ जून,

            ग्रुप ग्रामपंचायत माजगाव हद्दितील आणी पौध गावानजिक असलेला थरमॅक्स कारखान्यातील १६ माथाडी कामगारांस व्यवस्थापक यांनी घरचा रस्ता दाखविल्यामुळे २६ मे ला गेट समोर आमरण उपोषण सुरु केले.व्यवस्थापक आणी कामगार नेते संतोष बैलमारे यांच्या मध्यस्तीने आंदोलन स्थगिती करून कामगारांना लवकरात लवकर कामावर घेण्यांत येईल असे आश्वासन  व्यवस्थापक यांनी उपोषण कर्त्यास दिले.यामुळे उपोषण तुर्तास स्थगिती करण्यांत आले होते.मात्र १५ दिवसानंतर व्यवस्थापक यांची भुमिका संशासस्पद असल्यामुळे पुन्हा एकदा १६ जून ला थरमॅक्स गेट जवळ आमरण उपोषणाचे हत्यार उपसले जाणार आहे.
                    पंधरा दिवस उलटून गेल्यानंतर ही थरमॅक्स व्यवस्थापक यांनी दिलेले शब्द पाळले नसल्यामुळे कामगारांनी नाराजी व्यक्त केली.खोटे आश्वासन देवून, दिशा भूल करण्यांत येत असल्यांचे निदर्शनास येताच पुन्हा व्यवस्थापक जागे करण्यासाठी  आमरण उपोषणचे  हत्यार,उपसले जाणार आहे.गेले  अडीच महिने,कामगार घरी असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे.मात्र स्थानिक नेते सहकार्य करीत नसल्यांचा आरोप येथिल कामगार करीत आहे.आम्हाला जो पर्यंत कामावर घेत नाही तो पर्यंत आमचा लढा सुरुच राहणार आहे.
              १६ कामगारांचा रोजगार हिरावून व्यवस्थापकांस काय साध्य करायचे असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. गेली २२ वर्ष माथाडी कामगार  म्हणून काम करत होते.मात्र व्यवस्थापक यांनी कोणतीही पूर्व सूचना न देता आम्हाला घरचा रस्ता दाखविला.कामगारांनी व्यवस्थापक आम्हाला कामावर घेण्याची विनंती केली.मात्र त्यांस केराची टोपली दाखवली.यामुळे आम्ही सर्व कामगार १६  जून ला पुन्हा एकदा थरमॅक्स गेट समोर आमरण उपोषण बसणार असणार आहे.तसेच या संदर्भात अनेक ठिकाणी निवेदन देण्यांत आले.

Post a Comment

0 Comments

संतोष शिंगाडे यांना आरडीसी बॅंक च्या वतीने जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहिर