शिवसृष्टी पार्क येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती साजरी,
३०० महिलांसंह अहिल्या रत्नांचा केला सत्कार,
तर गोर गरिबांसाठी आरोग्य शिबीर संपन्न
माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : २ जून,
शिवसृष्टी पार्क शेलू येथे राजामाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी ३०० महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला.समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अहिल्या रत्नाचा सत्कार करण्यात आला,आणि गोरगरीब नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर राबविण्यात आले.
राजामाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती शेलू रायगड यांच्या वतीने दरवर्षी राजामाता अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.त्याचप्रमाणे यावर्षीही ३०० वी जयंती मोठया उत्साहात पार पडली.यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा अहिल्या रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी खोपोलीचे वनरक्षक नितीन मारुती कराडे यांना आदर्श वनपाल पुरस्कार,तर घोटावडे ग्रामपंचायत चे कार्यक्षम सरपंच पांडुरंग भगवान झोरे यांना आदर्श सरपंच पुरस्कार,समाजसेवक डॉ.राजाराम हुलवान यांना समाज भूषण पुरस्कार तर बाळासाहेब पुकळे यांची कुर्ला नागरी सहकारी बँकेच्या संचालक पदी निवड झाल्याने त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला,
ॲड.संदीप बागडे यांना आदर्श वकील पुरस्कार देण्यात आला,आदर्श शिक्षक बाळासाहेब शेळके, डॉ. रोहन पुकळे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला तर यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३०० महिलांचा विशेष सत्कार करून त्यांना साड्या वाटप करण्यात आल्या,तर डॉ.राजाराम हुलवान यांच्या माध्यमातून गोर गरीब नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर पार पाडले यात अनेकांनी तपासणी करून घेतली.
नंतर व्याख्याते कवी बाबासाहेब कोकरे यांनी राजामाता अहिल्यादेवी, होळकर यांच्या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले, तर ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनीही उपस्थिताना मार्गदर्शन करून प्रत्येक घरात एक तरी अधिकारी घडावा यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले आहे तर दहावी आणि बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष घाटे, रायगड जिल्हा अध्यक्ष प्रकाश उघडे, प्रभारी अध्यक्ष आनंदराव कचरे, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख तथा, उत्सव समितीचे अध्यक्ष रामचंद्र पुकळे, विलास पुकळे, डॉ रोहन पुकळे, शंकर पुकळे, ऋषिकेश पाटील, मोहिदीन मोकल, ज्ञानेश्वर जाधव, रवी राठोड, चंद्रकांत चाफे, अजय पवार, राजेश खरात, राज साळुंखे, रवींद्र माने, कोंडीबा माने, किसन कारंडे, भरत दोरे, नाचण सर, अक्षय चोपडे, कर्जत तालूका धनगर समाजाचे अध्यक्ष तुकाराम आखाडे, रायगड जिल्हा धनगर समाजाचे सचिव अनंता हिरवे,खालापूर तालूका अध्यक्ष हरेश ढेबे, पॉवरलिफ्टर बबन झोरे,शीतल पुकळे, मेघना तारे, उज्वला पुकळे, साक्षी मांडममहेश, राकेश जीवनवर राजेंद्र, म्हस्ककर,सुरेश मांडवकर, फरीद मिया सय्यद, नीलकंठ यादव, शकुंतला परदेशी, जयश्री कांबळे, मनीषा जाधव, भारती घुटूकडे, भारती जीवनवार, रंजना राठोड, मालिनी खरात, जया पवार, आदिसह अनेक समाज बांधवासह महिला मोठ्या संख्येने उपस्थिती होते
0 Comments