आठ वर्षांपूर्वी बिल्डिंगचं बांधकाम, पायाशी असलेल्या विहिरीची भिंत ढासळली, १८ कुटुंब बालंबाल बचावले; नाहीतर...

 रायगड : महाड शहरातील प्रभात कॉलनी येथे आठ वर्षांपूर्वीच बांधण्यात आलेल्या शिवम गृहनिर्माण सोसायटीच्या पायाशी असलेल्या विहिरीची संरक्षण भिंत कोसळल्याने बिल्डिंगच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव नगरपालिका प्रशासनाने या इमारतीच्या बी-विंगमधील १८ कुटुंबातील एकूण ७४ नागरिकांना तातडीने अन्य ठिकाणी हलवण्यात आलं आहे. महाड नगरपरिषदेच्या सामाजिक सभागृह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या ठिकाणी पर्यायी निवास व्यवस्था म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना हलविण्यात आले आहे.दर बिल्डिंग आठ वर्षांपूर्वी धारिया नामक बिल्डरने बांधली होती, अशी माहिती प्राशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, बिल्डिंगच्या स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे काम सुरू करण्याचे काम तातडीने सुरु करण्यात आले आहे. या अहवालानंतरच पालिका प्रशासनाकडून पुढील योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी दिली.



प्रभात कॉलनीमधील या शिवम गृहनिर्माण सोसायटीचे काम सुमारे १० वर्षांपूर्वी करण्यात आले होते, अशी माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बी-विंग लगतच्या पायाशी बांधण्यात आलेल्या विहिरीची संरक्षण भिंत कोसळल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पालिका प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सुरक्षिततेच्या कारणास्तव या विंग मधील सर्व १८ कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी जाण्याचे निर्देश दिले. नगरपालिका प्रशासनाने या संदर्भात अधिक तपासणी करण्यासाठी तज्ञांचे पथक तातडीने बोलावले असून त्यांच्याकडून स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल, असं बांधकाम अभियंता शेळके यांनी सांगितली.घटना समजतात महाडमधील सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये युवासेना शहर प्रमुख सिद्धेश पाटेकर, भारतीय जनता पक्षाचे अप्पा सोडकर, काँग्रेसचे ज्येष्ठ उपाध्यक्ष नानासाहेब जगताप, सामाजिक कार्यकर्ते उमेश जगताप यांचा समावेश होता.

Post a Comment

0 Comments

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक,देवनाव्हे येथे रक्तदान शिबीर,भारतीय जनता पार्टी पुढाकार,