दुपारी उन्हाचा तडाका ,सायंकाळी पाऊस,पहाटे धुके वातावरणात बदल

                     


विशेष : प्रतिनिधी
पाताळगंगा न्यूज  : १९ मार्च , दिवसेंदिवस वातावरणात मोठ्याप्रमाणावर उष्णता निर्माण होत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.मात्र दुपारी जरी उन्हाचे चटके बसत असले,तरी सुद्धा सायंकाळी वातावरणा त अचानक पणे बदल घडत असल्यामुळे विजाच्या गडगडात पावसाचे मोठ्या प्रमाणात आगमन होत असल्यामुळे यामुळे चारक मानांची मोठी धांदल उडत आहे.वातावरणात बदल घडत असल्यामुळे अनेकांना डॉक्टर सल्ला घ्यावा लागत आहे.

             दुपारी कडक उन्हाचे चटके, सायंकाळी गार पाऊस आणी पहाटे धुके जणू शॉवरच्या प्रमाणात निर्माण होत,असल्यामुळे  तिन्ही ऋतू जणू एकाच वेळी निर्माण झाल्यांचा भास प्रत्येकाला जाणवू लागले गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता जाणवत असल्यामुळे पदूषण, तापमानात वाढ व अन्य कारणांमुळे निसर्गाचे चक्र अनियमीत फिरु लागले आहेत.कोणता ऋतू कधी येईल कसा याचा अंदाज नाही.त्या प्रमाणेच रात्री हवेमध्ये थोडासा गारवा असला तरी दिवसा मात्र उन्हाच्या झळा बसत आहते. सकाळी ९ वाजल्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागत आहे.यामुळे पत्र्याच्या घरात वास्तव्य करणार्‍या लोकांची परवड होत असल्यांची खंत नागरिक व्यक्त करीत आहे.                                          

                                


                                                          मात्र सायंकाळी पावसाचा जोरदार बॅटिंग निर्माण होत असल्यामुळे शेतकरी चांगलाच धास्तावले आहे.पावसामुळे तोंडाशी आलेला घास जाण्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहे.पावसाचे तांडव मोठ्याप्रमाणावर निर्माण होत असल्यामुळे अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.शिवाय नोकर चालक वर्गांची मोठी धांदल निर्माण झाली आहे.आकाशात अचानकपणे ढग निर्माण होवून पाऊस येत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.

Post a Comment

0 Comments

उपसरपंच पदि वंदना सुधाकर महाब्दी बहुसंख्येने विजयी