दीपोत्सवाच्या माध्यमातून माजगांव येथील अखंड हरिनामसप्ताहांची सांगता

 


विशेष  : प्रतिनिधी 
पाताळगंगा न्यूज  २२ मार्च 
गुरुवर्य शांतीब्रम्ह धर्माचार्य, रायगड भूषण ह.भ.प.मारुती महाराज ( दादा ) राणे हालिवली - कर्जत व गुरुवर्य रायगड भूषण ह.भ.प. मधुकर महाराज पाटील माजगांव यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामस्थ महिला,तरुण मंडळ माजगांव यांच्या सदविचाराने अखंड हरिनाम सप्ताह व सामुदायीक ज्ञानेश्वरी पारायण करण्यात आले होते. गेली ३५ वर्ष माजगांव येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरु असून काल दीपोत्सवाच्या माध्यमातून सांगता करण्यात आली.        

                   






                                                     यावेळी कार्यक्रमास सामाजिक सांस्कृतीक,शैक्षणिक, राजकिय अशा विविध क्षेत्रातील  मान्यवर व्यक्ती आणि वारकरी संप्रदाय येथील थोर कीर्तनकार यांच्या माध्यमातून दीप प्रज्योलीत करण्यात आला.यावेळी उपस्थितानी आपले मनोगत व्यक्त केले.आणी दीपोत्सव प्रज्योलीत करून आणि ज्ञानेश्वराच्या पसायदानाने या कार्यक्रमाने सांगता करण्यात आली.

               







गेले सात दिवस अखंड नामस्मरण भजन, कीर्तन हरिपाठ यां गजराचा स्वर कानावर पडत असल्यामुळे मन प्रसन्न होत होते.यामुळे या ठिकाणी चैतन्य निर्माण झाले.                  काल दीपोत्सवाच्या व दुस-या दिवशी काल्याचे कीर्तन ह.भ.प.रामदास भाई महाराज पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आले.यावेळी कृष्ण चरित्र सांगून तसेच चालू घडामोडीवर विचार कीर्तनाच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केले.नामाशिवाय दुसरे साधन नाही,जीवनातील भवसागर पार करायचे असेल तर यावरती उपाय म्हणजे नामस्मरण असे अनमोल विचार किर्तनांच्या माध्यमातून व्यक्त केले.आणि या अखंड हरिनामाची सांगता करण्यात आली.       


                             



      

Post a Comment

0 Comments

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन