वणव्यामुळे झाड पडले विजेच्या तारेवर,विद्युत पोलांची दुरवस्था,चालकांनी वहान धिम्य करुन अनर्थ टळले,वाहनांचे सौम्य नुकसान

 



पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
       १९ एप्रिल,                                                                  
                  रस्त्यालगत लागलेल्या  वणव्यामुळे वृक्ष,औषधी वनस्पती, त्याच बरोबर मुक्या प्राण्यासमवेत सर्वानांच सहन करावा लागत आहे.असाच प्रकार सावरोली - खारपाडा मार्गावरील आंबिवली येथे घडला गेला आहे. जळालेला वृक्ष हा विजेच्या तारेवर पडल्यामुळे त्याच वेळी या मार्गावरून दुसरे अवजड वाहन जात असतांना यांचा विजेच्या तारेला स्पर्श होताच त्याच विजेचा पोल झुकल्यांने समोरून येणारी एमएच  ४६ बीयू २४४५ या वहान चालकांनी पहाताक्षंणी प्रसंग अवधान राखून वहान धिम्य गतीने करून होणारा अनर्थ टळला मात्र वहानांचे सौम्य नुकसान झाले.
             हे वहान कुंभीवली येथून खारपाडा या मार्गी जात असल्यांचे समजते.मात्र रस्त्यालगत वणवे किती धोकादायक असू शकतात.हे जिवंत आणी ज्वलंत उदाहरण या ठिकाणी पहावयास मिळाले.यामुळे  मोठा अपघाताला सामोरे जावे लागले.वहान चालकांच्या समोरील काचेला येवून विजेचा पोल झुकलेला पहावयास मिळाले मात्र वहान चालकांनी तातडीने वहानावरील नियंत्रण ठेवून पुढील मोठा अनर्थ टळला गेला.या वहान चालकांचे मालक माजी सरपंच ज्ञानेश्वर मालकर ( तळवली ) यांनी घटनास्थळी धाव घेवून अपघाताची माहिती घेण्यात आली.

          सदर या घटनेची माहिती मिळताच चौक येथिल विज कर्मचारी यांनी या ठिकाणी जावून विज पुरवठा बंद करण्यात आला.मात्र या अपघात कुणालाही दुखापत झाली नसून या वहनांचे पुढची काच पुर्णपणे तुटल्याची पहावयास मिळाली.या मार्गावर कारखाने मोठ्याप्रमाणावर असल्यामुळे वहानांची सातत्याने रेल - चेल सुरु असते मात्र काही वेळा वहान चालक नियोजित वेळावर पोहचण्यासाठी अतिवेगाने वहान चालविता परिणामी स्वताच्या बरोबर दुसऱ्याचा अपघात घडण्यांस कारणीभूत होत आहे.
            




Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण