पाताळगंगा न्यूज खोपोली : २० एप्रिल,
शिवसेनेच्या कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघाच्या समन्वयकपदी ज्येष्ठ पत्रकार बाबू पोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या हस्ते बाबू पोटे यांना कर्जतच्या बाळासाहेब भवनमध्ये झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात नियुक्तीचे पत्र देण्यात आले. माजी आमदार सुरेश लाड यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या बाबू पोटे यांनी ७ एप्रिलला आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शिवसेनेत प्रवेश केला होता. बाबू पोटे यांची उपयुक्तता ओळखून आमदार महेंद्र थोरवे यांनी त्यांच्यावर विधानसभा समन्वयक ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. शिवसेना आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यासाठी या पुढे प्रामाणिक काम करताना संघटनावाढीसाठी प्रयत्न करू असे मत बाबू पोटे यांनी निवडीनंतर व्यक्त केले आहे. दरम्यान नियुक्ती पत्र प्रदान करताना संपर्क प्रमुख विजय पाटील, तालुका प्रमुख संदेश पाटील, अंकुश मोरे, लक्ष्मण येरम उपस्थित होते. निवडीनंतर बाबू पोटे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.
0 Comments