वेणु चा नादब्रह्म आपल्या जिवनांचा गाभा आहे : ह.भ.प. रामदास भाई महाराज पाटील

 




पाताळगंगा न्यूज  : वृत्तसेवा 
वारद  : २८ एप्रिल, 
 
                  जिवनात संगित क्षेत्राला खूप महत्व आहे.त्याच बरोबर त्यासाठी लागणारे वाद्य हे जिवनात तीन गुण दाखवित असतात.रजोगुण,तमोगुण,सत्वगुण असे वाद्याचे तीन प्रकार पडत असतात.त्याच बरोबर श्रीकृष्णाने वेणू नावाच्या वाद्याला जिवनात उत्तम असे महत्व सांगितले आहे.नाद डोळ्यांनी दिसत नाही.मात्र कानाला जाणवत असतो.त्याच प्रमाणे नाद माणसांचे अंतरग बदलत असतो.त्याच बरोबर जिवनात वाद्याचा मोठा इतिहास असून या मध्ये वेणु ला खूप मोठे महत्व प्राप्त झाले आहे .असे मत अखंड भक्ती रसामृत यज्ञोत्सव  सोहळा वारद येथे काल्यांच्या किर्तनात ह.भ.प. रामदास भाई महाराज पाटील बोलतांना व्यक्त केले.

                     काल दीपोत्सव वाच्या माध्यमातून या या ठिकाणी सामाजिक सांस्कृतिक,राजकीय,शैक्षणिक,वारकरी आश्या विविध माध्यमातून या ठिकाणी उपस्थित होते.या अखंड भक्ती रसामृत यज्ञोत्सव आयोजन हनुमंत विष्णू लभडे यांच्या माध्यमातून करण्यात आले

                   हे द्वितीय वर्ष असल्यामुळे या कार्यक्रमास यात्रे सारखे प्रचंड स्वरूप प्राप्त झाले होते. मुखात विठ्ठलांचे नावाचा गजर,आणी टाळ्यांचा कडकडाट ने हा परिसर दुमदुमून गेला. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले.

            यावेळी भाई महाराज पुढे म्हणाले की  श्रीकृष्णाने शिष्टाचार शिकविला की स्वताच्या जवळ असलेली वस्तू दुसऱ्यास देणे.त्याच बरोबर आज समाजातील रीती रिवाज कालभाह्य होत, असून पाश्चात्य संस्कृती जोपासली जात आहे.माणूस संताच्या दिलेल्या शिकविणीतून मोठा होत असतो.त्यासाठी त्यांने केलेले परिश्रम आपणांस दिसत नाही.वेणू नी स्वताला छिद्रे पाडून घेतल्यामुळे त्यामधून सुंदर असे ध्वनी निघत आहे.तसेच व्यसन हे प्रमाणापेक्षा जास्त केल्यास माणूस स्वताला विसरतो व्यसन हे टेन्शन घालवित नाही तर वाढवितो.       

                   मात्र श्रीकृष्णाच्या सहवासात घोंगडी,वेणु,माती संपर्कात आल्यांने त्यांचे महत्त्व वाढले आहे.या मातीला फार महत्व असून या मातीचे महत्व खूप सांगितले आहे.सकाळी या भुमिला वंदन केल्यांस दिवस खूप आनंदाचा जातो.असे प्रतिपादन वारद येथिल अखंड भक्ती रसामृत यज्ञोत्सव सोहळ्याच्या काल्यांच्या किर्तनात बोलतांना व्यक्त केले. हा कार्यक्रम  ह.भ.प. रामदास ( भाई ) महाराज पाटील यांच्या प्रेरणेने, ह.भ.प.हनुमंत विष्णू लभडे यांच्या संकल्पनेतून,ज्ञानेश्वर महाराज पाटील (खानाव )यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

                    यावेळी या कार्यक्रमास ह.भ.प. पांडुरंग महाराज पाटील निगडोली, तानाजी महाराज कर्णुक ( धा. पंढरी ) महादेव महाराज मांडे रिसवाडी, शंकर महाराज कुंभार तुपगांव, अनंत महाराज खंडागले चौक, काशिनाथ महाराज लबडे मोहपाडा, वसंत महाराज कुंभार तुपगांव, अनंत महाराज कारले मोपाडा महेश महाराज साळुंखे पाटणोली,ज्ञानेश्वर महाराज पाटील- वावोशी,रमेश महाराज पाटील आंबिवली, मधुकर महाराज पाटील माजगांव, माधव महाराज कर्णूक- बीड, चैतन्य महाराज खंडागले - चौक, प्रभाकर महाराज सालेकर चौक, किरण महाराज घोसाळकर - सावरोली, किशोर महाराज बैलमारे सावरोली, संजय महाराज बारस्कर खरसुंडी, पद्माकर महाराज पाटील कसलखंड, अविनाश महाराज सालेकर खरसुंडी,दिनकर महाराज फराड निगडोली, सुदर्शन महाराज मते सावळे, भरत महाराज पवार मोहपे, भगवान महाराज पाटील भोकरपाडा विलास महाराज गावंड केलवणे, प्रणित महाराज महाब्दि-  पौध
             

 अनंत महाराज पाटील कसलखंड ज्ञानेश्वर महाराज शिंदे - वांगणी,रवींद्र महाराज पाटील आपटी, निवृत्त महाराज शिंदे हलीवली, वैभव महाराज पवार चौक,अशोक महाराज थोरवे, कर्जत उद्धव महाराज देशमुख नवघर,मारुती महाराज पाटील चावणे, जयवंत महाराज राणे चौक, जयेश महाराज पाटील वडगांव,अक्षय महाराज चव्हाण गुरुकुल महड,यश महाराज बडेकर गुरुकुल महड, विशाल महाराज लबडे गुरुकुल महाड, राज महाराज ठोंबरे गुरुकुल महड, विठ्ठल महाराज गोंधळी कराडे, आदरणीय  ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मंगेश राम लबडे,सरिता मुकेश लबडे अदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण