ओव्हरलोड माती ट्रकने लौजी ग्रामस्थ हैराण,धुळीमुळे विविध श्वसनांचे आजार निर्माण होण्याची भिती

 


जयवंत माडपे                                                        खोपोली : २९ एप्रिल

               खोपोली नगरपालिका हद्दीतील लौजी या गावाच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात मातीची अवैधरित्या मातीची वाहतूक करण्यात येत आहे.या मातीची रॉयल्टी भरली की नाही? याबाबत ग्रामस्थांमध्ये  चर्चा आहे. महसूल कर्मचारी व माती माफिया यांच्यात साठेलोटे असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. माती भरून ट्रक गावातून जात असल्याने ओव्हरलोड माती भरल्याने ती खाली पडून रस्त्यालगतच्या घरांमध्ये जात असल्याने ग्रामस्थान मध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत ,या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.                                                          ओवरलोड वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. अनेकदा शासकीय कार्यालय रविवारी बंद असल्याने त्याच दिवशी प्रचंड प्रमाणात मातीची वाहतूक करण्यात येत असते. याबाबत स्थानिक महसूल कर्मचारी यांना विचारणा केली असता मार्चच्या अगोदरच ठेकेदाराने आगाऊ रक्कम भरल्याचे सांगितल्याने मोठ्या प्रमाणात याबाबत शंका निर्माण झाली आहे.

चौकट 

"जर  रॉयल्टी भरली नसेल तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, त्याबाबत महसूल कर्मचाऱ्यांना तसे आदेश देण्यात आले आहेत. ( खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी )

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर