वकीली क्षेत्रात करिअर करण्यासाठी सहज सेवा फाऊंडेशनच्या वतीने मार्गदर्शन शिबीर, ॲड. मीनाताई बाम यांनी विद्यार्थ्यांस केले मार्गदर्शन

 


दीपक जगताप                                                       खालापूर १९ एप्रिल,

सहज सेवा फाऊंडेशनच्या च्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित असतांना एक पाऊल पुढे टाकत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले.१२ वी  पदवीधर परीक्षांचे निकाल लवकरच लागतील, पुढे काय करावे ? हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थी व पालकांच्या मनात  असतो.यासाठी आधी पासूनच तयारी करुन वकिली क्षेत्रात करिअर घडविण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे वकिल होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सहज सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून दिनांक १८  एप्रिल २०२३  रोजी लोहाणा समाज हॉल,खोपोली येथे खालापूर तालुक्यातील ज्येष्ठ वकील ॲड.मीना बाम मॅडम यांनी मार्गदर्शन केले.                                       सहज सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्यपूर्ण  उपक्रम राबविले जातात. शैक्षणिक क्षेत्रात लैंगीक शिक्षण, सायबर क्राईमवर मार्गदर्शन,करिअर गाईडन्स या उपक्रमाने विद्यार्थ्यांना पालकांना मौलिक मार्गदर्शन मिळत आहे. मार्गदर्शन करण्यात आले. विवीध उदाहरणे व प्रासंगिक दाखले देत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करीत उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना ॲड. मीना बाम यांनी समर्पक उत्तरे दिली.   


                   सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहज सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे,कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी,उपाध्यक्षा इशिका शेलार, सचिव अखिलेश पाटील, खजिनदार संतोष गायकर,संघटक निलम पाटील,जनसंपर्क प्रमुख जयश्री कुळकर्णी,खालापूर तालुका प्रमुख मोहन केदार,उपक्रम प्रमुख सोहम ढोकळे,आर्या शिंदे,वेदांत मोरे,साहिल जांभळे,सागरिका जांभळे यांनी अथक मेहनत घेतली.                      वकील क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणाऱ्यांनी खडतर मेहनत घेवुन आपले स्वप्न साकार करताना सामाजिक बांधिलकी जपून काम करावे असे प्रतिपादन रायगड जिल्ह्यातील पहिल्या महिला प्रॅक्टीसिंग वकील ॲड.मीना बाम यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर