कर्जत नगरपरिषदेची स्वच्छतेसाठी एक धाव...



अजय गायकवाड                                                 नेरळ / कर्जत १८ एप्रिल,

            'एक धाव स्वच्छतेसाठी'हे ब्रीद वाक्य घेवून कर्जत नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२३ आणि माझी वसुंधरा अंतर्गत कर्जत शहरामध्ये मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते,यामध्ये सहा वर्षाच्या मुलापासून ७५  वर्षाच्या आजोबांनी सहभाग नोंदवत प्लॅस्टिक बंद तर स्वच्छतेसाठीची जनजागृतीसाठीचे पहिले पाऊल स्वतः पासून टाकले. विद्यार्थी, पालक, व्यापारी, डॉक्टर,यांसह उच्चशिक्षित वर्गाने देखील आपला सहभाग नोंदवत खारीचा वाटा उचलल्याचे दिसून आलं.

       कर्जत नगरपरिषदेने रोटरी क्लब कर्जत, जेष्ठ नागरिक संस्था, उत्कर्ष इव्हेंट, संस्कार भारती, एसबीआय लाईफ यांच्या सहकार्याने मॅरेथॉन -२०२३  या स्पर्धेचे आयोजन केले होते.यासाठी वेगवेगळ्या वयोगटातील तरुण तरुणींसाठी,तर जेष्ठ नागरिकांसाठी आठ, चार दोन किलोमीटर धावण्याची स्पर्धा आयोजित केली होती,नियमीत धावणे,व्यायाम केल्यास शरीराचे  स्वास्थ चांगले राहते,रोग प्रतिकारक शक्ती वाढते हाच या मागचा हेतू असून शहरातील इतरत्र टाकलेल्या कचऱ्या पासून रस्त्यावरून धावणाऱ्या,चालणाऱ्या नागरिकांच्या जीवाला या पासून विविध आजाराच्या समस्यांना नकळत सामोरे जावे लागत असते,       


                 नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून कचरा हा इतरत्र न टाकता कचरा कुंडीत टाकावा किंवा घंटा गाडीत टाकावा म्हणून सांगण्यात आले तर प्लॅस्टिक पिशवीचा वापर टाळून आरोग्य वाचवा म्हणून मोहीमेची जनजागृती करण्यात आली,एक धाव स्वच्छतेसाठी'हे ब्रीद वाक्य घेवून निघालेल्या कर्जत नगरपालिका प्रशासनाने अखेर जनजागृती घडवून आणली यासाठी नागरिकांनी देखील याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला.यावेळी स्वच्छतेची व हरित शपथ देण्यात आली. 

               नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी वैभव गारवे, नगरसेवक राहुल डाळिंबकर, कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के डी कोल्हे, बाळ विवेक दांडेकर, हेमंत ठाणगे, संचिता पाटील, प्राची डेरवणकर तर यावेळी नगरसेवक,तर शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित झाले होते.याप्रसंगी भाजप अशोक ओसवाल, जितेंद्र परमार, अरविंद जैन, हुसेन जमाली, डॉ. प्रेमचंद जैन, डॉ. बी. एल. पाटील, जेष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष सुभाषचंद्र नातू, संस्कार भारतीचे पांडुरंग गरवारे, केतन जोशी, हेही उपस्थित झाले होते. संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन व नियोजन उत्कर्ष इव्हेंटचे प्रदीप गोगटे यांनी आपल्या खास शैलीत स्पर्धेत रंगत आणली. स्पर्धेत प्रथम,द्वितीय, व तृतीय,येणाऱ्यांना खास बक्षीस देण्यात आले तर ज्यांनी आपला सहभाग नोंदविला त्यांनाही नागरपरिषदेकडून टी शर्ट भेट स्वरूपात देण्यात आले होते.


Post a Comment

0 Comments

माजगाव येथे हनुमान जन्मोत्सव  मोठ्या उत्सहात  साजरा