माथेरान मध्ये महाविकास आघाडी व शिवस्फूर्ती मंडळातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

 


अजय कदम                                                          माथेरान : २२ एप्रिल,

          हिंदवी स्वराज्याचे व मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे एक श्रद्धास्थान व स्फूर्तीस्थान असून त्यांची ‘शिवजयंती’ हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे.अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर तिथीनुसार सालाबादप्रमाणे या हीवर्षी माथेरान मध्ये महाविकास आघाडीतर्फे  व शिवस्फूर्ती तरुण मित्र मंडळातर्फे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील महाराजांच्या  पुतळ्याला माथेरान काँग्रेसचे  विद्यमान अध्यक्ष विजय गजानन कदम व बिलाल महापुळे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.                                                                    तसेच माथेरानचे भूमिपुत्र वीर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या अर्ध पुतळ्यास माथेरान च्या माजी उपनगराध्यक्षा   विनीता दिलीप गुप्ता यांनी पुष्पहार अर्पण केला. हुतात्मा स्तंभास माजी नगरसेविका सुषमा जाधव, सोनम दाभेकर, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा स्वाती कुमार, महिला सम्पर्क संघटिका संजना शेलार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.   


                  माँसाहेब मीनाताई ठाकरे  बालवाडी जवळील असलेल्या स्फूर्तिदायक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती शिवपुतळ्याचे पूजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला शहर संघटिका परांदू प्रमोद मोरे तसेच उपशहर महिला संपर्क संघटिका संजना संदिप  शेलार, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा स्वाती मोरे आणि समस्त  महिला मंडळ उपस्थित होत्या यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच माथेरानचे माजी नगराध्यक्ष विवेकभाई चौधरी आणि माजी नगरसेवक व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ भागोजी कदम यांच्या शुभहस्ते महाराजांस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन श्रीफळ वाढविण्यात आले.                       यावेळी माथेरानचे शिवसेना(UBT) शहर प्रमुख मा  प्रसादभाई सावंत, माजी नगराध्यक्ष  अजय का. सावंत, काँग्रेस पक्षाचे विद्यमान अध्यक्ष  विजय गजानन कदम,शिवसेना 【UBT】पक्षाचे माजी नगरसेवक  नारायण अप्पा कदम,  व माजी नगरसेविका सुषमा कुलदीप जाधव, माजी नगरसेविका आणि विद्यमान महिला शहर संपर्क प्रमुख सोनम सचिन दाभेकर,  किर्ती किशोर मोरे, पत्रकार मित्र गिरीश पवार,  चंद्रकांत काळे, पतपेढीचे सदस्य नितीन शेळके,  आर. एन. तिवारी,  प्रशांत कदम, चर्मकार समाजाचे माजी अध्यक्ष  सूर्यकांत कारंडे,  युवासेना अध्यक्ष निमेश मेहता, श्रेयश गायकवाड, फझल महापुळे, समीर पन्हाळकर,विजय सावंत, दर्शन व हर्ष सावंत, मदन पाटील, परांदू मोरे, हेमा सावंत, सुवर्णा जाधव, नकोशा पाटील तसेच समस्त  महाविकास आघाडीचे व शिवस्फूर्ती तरुण मित्र मंडळाचे आजी माजी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.                                                 यावेळी शिवस्फूर्ती तरुण मित्र मंडळाचे विद्यमान अध्यक्ष  सचिन विठ्ठल दाभेकर, उपाध्यक्ष  किशोर मोरे, खजिनदार  नितीन वि. सावंत  तसेच विभागप्रमुख रवींद्र परब, राजेंद्र कदम, अविनाश परब, मनोहर चाळके, मंगेश शिंदे, प्रमोद मोरे,प्रशांत कदम,अक्षय परब कुंजन शिंदे इत्यादी मान्यवर आणि शिवप्रेमी उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी  छत्रपती शिवाजी महाराजांना मनोभावे वंदन करून मानाचा  मुजरा अर्पण केला. यावेळी फटाक्यांची  आतिषबाजी  करण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने आसमंत दणाणून गेला .

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर