पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
२२ एप्रिल,
ऐतिहासिक वारसा असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे सहकारी सरनौबत नेताजी पालकर यांचे हे जन्म गाव म्हणून प्रसिध्द आहे.अशा या इतिहासकालीन असलेले चौक बाजारपेठ लोकमान्य टिळक मोफत वाचनालय आहे. आज १०३ वर्ष या ग्रंथालय यांना झाली असून, दि २३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन आणि जगप्रसिध्द साहित्यिक शेक्सपिअर यांचा जन्मदिन म्हणूनच साजरा होत असतांना भव्य अश्या पुस्तकांचे प्रदर्शन दोन दिवस भरविण्यात येणार असल्यांचे अभिजित चौधरी ग्रंथपाल यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
लोकमान्य टिळक हे स्वर्गवासी झाल्यानंतर ९ ऑगस्ट १९२० रोजी या ग्रंथालयांची स्थापना करण्यात आली.आज या ठिकाणी नियमित वर्तमान पत्रे समवेत विविध प्रकारची पुस्तके या ठिकाणी वाचण्यांस मिळत आहे.जवळ - जवळ १२५०० पुस्तके असून ५५० सभासद संख्या आहे.असे म्हटले जाते पुस्तक वाचल्यांने मस्तक सुधारते आणी मस्तक सुधारले की ते कुणापुढे नतमस्तक होत नाही.आज या ठिकाणी हजारोच्या संख्याने पुस्तके असून प्रत्येक जण ही पुस्तके वाचण्यांचा आनंद घेत आहे.
या लोकमान्य टिळक मोफत वाचनालय अनेक कार्यकारी होवून गेले आणी विशेष म्हणजे अनेक वर्ष झाली असूनही हे ग्रंथालय सुरळीतपणे सुरु आहे.या ग्रंथालयाचे अध्यक्ष सुरेश सदाशिव वत्सराज,सेक्रेटरी - सतीश कृष्णा आंबवणे,विश्वस्त - रजनीकांत मोतीलाल शाह,ग्रंथपाल - अभिजित चौधरी, तपासनीस - ऐश्वर्या जोशी,डॉ .श्रीनिवास गजानन वाळिंबे,डॉ.अपर्णा श्रीनिवास वाळिंबे,रंजना पंढरीनाथ साखरे,अशोक बाळकृष्ण चौधरी,काशिनाथ रघुनाथ खंडागळे,पूनम प्रभाकर चोगले,राजन मोतीलाल चौधरी,अजिंक्य अशोक चौधरी,राजेश गोविंद आंबवणे,मुरलीधर नाना साखरे
त्याच बरोबर मनोज भालचंद्र साखरे,
सदर या प्रदर्शनास या परिसरातील वाचकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.त्याच बरोबर या ठिकाणी स्पर्धा परिक्षा चे पुस्तके या ठिकाणी ठेवण्यात आल्यांचे सांगण्यात आले.
0 Comments