गुरुनाथ साठीलकर खोपोली : २७ मे ,
खोपोली शहरासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात आपल्या शैक्षणिक कार्याचा ठसा उमटविणाऱ्या करिअर कोचिंग क्लासचा विद्यार्थी सुमित डे याने इयत्ता १२ वी वाणिज्य विभागातून 95.67% एवढे गुण प्राप्त करून संपूर्ण रायगड जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
खोपोली शहरातील करिअर कोचिंग क्लासेस ही गेली दोन दशके शिक्षण क्षेत्रात नावाजलेली संस्था असून तेथे कला, वाणिज्य व विज्ञान या शाखेतील विद्यार्थी वर्गाला आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी मुफद्दल शाकीर आणि जमीला यांचे मार्गदर्शन लाभते आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही गुणवत्तेची परंपरा या संस्थेतील विद्यार्थ्यांनी टिकवली आहे.
स्मृति मिरवणकर (92.67%) गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे तर अनेक विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले आहे, यात वाणिज्य विभागातून सार्थक मिंडे (91.50%), सिद्धेश मुसळे (91.17%), यश हुनगुंद (89.67%), रिद्धी शानबाग (89%) यांचा समावेश आहे. विज्ञान विभागातून विधी माने (88.17%) गुण मिळवून महाविद्यालयात दुसरी व संस्थेतून विज्ञान विभागात प्रथम येण्याचा मान पटकविला आहे. करियर कोचिंग क्लास या संस्थेतून प्रत्येक विद्यार्थ्याचा शैक्षणिक विकास कसा होईल आणि त्याची गुणवत्ता कशी वाढेल यावर संस्थेच्या प्रत्येक घटकाचा कटाक्ष असतो परिणामांती दरवर्षी या संस्थेचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकतात' असे प्रतिपदन करिअर क्लासेसचे संचालक मुफद्दल शाकीर यांनी केले आहे. खोपोली करांनी या क्लासवर विश्वास ठेवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहे.
चौकट:
प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन करून जास्तीत जास्त गुण आणि गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न असतात.( मुफद्दल शाकीर व्यवस्थापक : करिअर कोचिंग क्लास, खोपोली.
0 Comments