गुरुनाथ साठीलकर खोपोली : २९ मे,
भारतातील सर्वात मोठी पाळीव मांजराची संघटना "फेलाईन क्लब ऑफ इंडिया", लायन्स क्लब ऑफ खोपोली आणि श्री कृपा ॲक्वेरियम यांच्या माध्यमातून डॉ. रामहरी धोटे सभागृह - लायन्स सर्व्हिस सेंटर येथे खोपोली शहरातील पाळीव मांजरांची नोंदणी शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी मांजरांच्या शरीरात १६ अंकी मायक्रोचीप बसवली गेली त्याच सोबत मांजरीची जात आणि मालकीचे प्रमाणपत्रही दिले गेले. मांजरांना अँटी रेबीज व्हॅक्सिनेशन देऊन तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी केली गेली आणि मांजरांसाठी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि औषधे देखील भेट दाखल दिली गेली.
फेलाईन क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष साकिब पठाण, झेड कॅनिंन डॉग ट्रेनिंग अकॅडमी - नाशिकचे अध्यक्ष विक्रांत देशमुख, लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या अध्यक्षा शिल्पा मोदी, श्री कृपा ॲक्वेरियम - खोपोलीचे संचालक प्रवीण शेंद्रे, प्रयोग केनलचे संचलक प्रवीण व्यास, Drools पेट फूडच्या उर्मिला पाटील आणि जितेंद्र शहा, श्री कृपा ॲक्वेरियम - माणगावच्या संचालिका संध्या कुलकर्णी, ग्रेन झिरो पेट फुडचे संदेश जाधव, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर आणि नवीन मोरे अश्या लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या पदाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवरांनी शिबिरात सहभाग घेतला.

पाळीव मांजरांच्या नोंदणी शिबिराच्या सकाळच्या सत्रात नोंदणीसह तपासण्या, औषधोपचार, सल्ला आणि प्रमाणपत्राचे वितरण केले गेले तर संध्याकाळच्या सत्रात झेड कॅनन डॉग ट्रेनिंग अकॅडमी नाशिकचे विक्रांत देशमुख आणि फेलाईन क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष साकीब पठाण यांनी मांजराच्या मालकांना मार्गदर्शन आणि महत्वाच्या टिप्स दिल्या.
या शिबिरात शंभरहून अधिक पाळीव मांजरांच्या मालकांनी आणि अनेक प्राणी मित्रांनी या शिबिराचा लाभ घेतला. खोपोली सारख्या या शहरात इतर शहरांच्या तुलनेत मिळालेला उत्स्फूर्त सहभाग समाधानकारक होता असे साकिब पठाण यांनी आपले मत व्यक्त केले. धकाधकीच्या जीवनात प्राणिमात्रांवर प्रेम करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने अशा स्वरूपाच्या शिबिरांचे आयोजन वेळोवेळी केले जाईल असेही त्यांनी अभिवचन दिले.
११ जून रोजी वाशी सीबीडी एक्जीबिशन हॉल येथे जगातल्या सर्वात मोठी पाळीव मांजरांची चॅम्पियनशिप स्पर्धा होणार आहे त्यासाठी खोपोलीतल्या मायक्रोचिपींग केलेल्या सर्व मांजरांच्या मालकांना स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

0 Comments