कृष्णा भोसले तळा : १८ जून,
अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून देखील या गावाचा विकास झाला नाही.कार्यसम्राट आमदार भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने आम्हाला विकास कामे करण्याचे आश्वासन दिल्यामुळे आम्ही शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहोत असे वानस्ते ग्रामस्थ आणि मुंबईकर मंडळांनी यावेळी सांगितले. या पक्षप्रवेश समारंभासाठी उपस्थित जिल्हाप्रमुख प्रमोजी घोसाळकर युवा जिल्हाधिकारी विपुल उभारे तळा तालुकाप्रमुख शहर प्रमुख तसेच नगरसेवक आणि तालुक्यातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते. यावेळी वानस्ते ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपण एवढ्या वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राहून देखील तुमच्या गावाचा भागाचा विकास झाला नाही ही खेदाची गोष्ट आहे आपण आमच्याकडे आलात किंवा नाही आला तरी देखील आम्ही तुम्ही सांगितलेली विकास कामे करणार आहोत असे आपल्या मार्गदर्शनात सांगितले,आपण शिवसेना पक्षात येण्याचा जो योग्य निर्णय घेतला आहे त्याबद्दल आपले शिवसेना पक्षात आम्ही स्वागत करत आहोत काही या गावातील आणि या भागातील विकास कामे असतील ती आम्ही नक्कीच पूर्ण करण्यासाठी ही आम्ही समोर बसलेली मंडळी कटिबद्ध राहू आम्ही राष्ट्रवादी सारखे आपणास फक्त अश्वासन देणार नाही तर विकास कामे करून दाखवू,असे ग्रामस्थांना या समयी अभिवचन देण्यात आले आहे
0 Comments