पाताळगंगा न्यूज वाशिवली : १९ जून
तरुणांनी शरीर संपत्ती कमविली पाहिजे,या उद्देशाने ग्रूप ग्राम पंचायत वडगांव सरपंच गौरी महादेव गडगे यांच्या हस्ते नुकताच शिवशक्ती व्यायाम शाळेचे अनावरण करण्यात आले. तसेच या मध्ये विविध प्रकारचे साहित्य या मध्ये ठेवण्यात आले असल्यांचे समजते.यावेळी या ठिकाणी परिसरातील असंख्य तरुण व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते.प्रत्येकांचे शरीर हे पिळदार व्हावे, या उद्दात विचारांतून ही व्यायाम शाळा उभारण्यात आली आहे. या परिसरात गावे वाड्या येत असल्यामुळे येथे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात असून प्रत्येक तरुण वर्गांने आपले शरीर पिळदार बनविण्याची महत्वकांक्षा होती.व्यायाम शाळा नसल्यामुळे आपले शरीर पिळदार बनविण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही.काही ठिकाणी खाजगी व्यायाम शाळा असून दर महिन्याला पैसे भरावे लागते.शिवाय वेळेची मर्यादा या विचारांतून अनेक जण व्यायाम करणे टाळले जाते.मात्र अनेक वर्षांतून या परिसरात राहणारे तरुण वर्गांना व्यायाम शाळा मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पहावयास मिळाले
या शिवशक्ती व्यायाम शाळेच अनावरण उपस्थित म्हणून सरपंच गौरी गडगे,मा.जि.प. सदस्य मोतीराम ठोंबरे,उप जिल्हा प्रमुख भाजप - सुधिर ठोंबरे,बिर्ला व्यवस्थापक प्रकाश देसाई,उद्योजक अनिल चव्हाण,प्र. सरपंच खानावले - मोहन लभडे,सदस्य - महादेव गडगे,सदस्या - वर्षा पाटील,शिवाजी शिंदे,राजेश पाटील,सामाजिक कार्यकर्ते - दशरथ पाटील,संदिप शिंदे,या कार्यक्रमाचे आयोजन गावदेवी ब्रास बॅंड,जय मल्हार टिम,वेद सह्याद्री ग्रूप,व नवतरुण मित्र मंडळ वाशिवली अदि ने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
0 Comments