सबुरी हेरटेक ठेकेदारांची वाढली दबंगगिरी,रस्त्यावर बांधकामाचे साहित्य,रस्ता जणू आपलाच,अपघाताला निमंत्रण

 

शिवाजी जाधव                                                           खोपोली :२७ जून,

       
                खोपोली नगरपरिषदेच्या हद्दीतील भानवज रोडवर खोपोलीतील सबुरी हेरटेक च्या ठेकेदाराची सध्या मोठ्या प्रमाणात दबंगगिरी  सुरू असल्याची पहावयास मिळत आहे. सबुरी हेरटेक च्या ठेकेदाराने भानवज  गावाकडे जाणाऱ्या रहदारीच्या रस्त्यावरच भव्य इमारत साठी लागणारे साहित्य रस्त्यावरच टाकून रस्ता आपल्याच मालकीचा आहे असे समजत आहे.या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक यांच्या अपघाला निमंत्रण मिळत असल्यांचे चित्र या ठिकाणी पहावयास मिळत आहे.
             यापूर्वी सुद्धा अपघातास निमंत्रण देणारा ठरत असल्याने या घटनेकडे आम्ही लक्ष वेधले होते मात्र दबंगिरी करणाऱ्या ठेकेदाराने दक्षता देण्या ऐवजी जास्त प्रमाणात अपघात कसे होईल. इमारतीचे साहित्य रहदारीच्या ठिकाणी रस्त्यावर टाकत असल्यामुळे येथिल ग्रामस्थ,वहानचालक,व्यापारीवर्ग  संताप व्यक्त होत आहे. खोपोली नगरपरिषदेचे विद्यमान मुख्याधिकारी अनुप दुरे पाटील हे या घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर करीत नाहीत ना? की मुख्याधिकाऱ्यांचा अभय ठेकेदारास आहे की काय अशी चर्चा येथिल प्रवासी वर्ग व्यक्त करीत आहे.मात्र अपघात झाल्यानंतर पाउले उचलली जातील का ? 

               मुख्याधिकारी अनुप दुरे पाटील यांच्या वरदहस्त असल्यामुळे खोपोलीतील सबुरी हेयरटेक चा बिल्डर्स आपली मनमाई कारभार करीत आहे.की काय ?मात्र असे असले तरी सुद्धा मुख्याधिकारी हे या विषयाकडे लक्ष देतील काय? की मोठा अपघात झाल्यावर लक्ष देणार अशी चर्चा या परिसरात होत असताना ऐकण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर