पाताळगंगा न्यूज वृत्तसेवा चावणे / कराडे खुर्द : २६ जून,
महाराष्ट्र ही संताची भुमी आणी या भुमित वारकरी संप्रदाय मोठ्याप्रमाणावर असून दर वर्षी मोठ्याप्रमाणावर विठ्ठुराच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखो हून भाविक भक्त पंढरपूर जात असतात. ज्यांस काही तांत्रिक अडचणी मुळे जाता आले नाही तर,सांजगाव किंवा गावामध्ये असलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात दर्शन घेण्यासाठी जात असतात.वर्षातून एकदाच ही आषाढी एकादशी येत असल्यामुळे मनाच्या बरोबर शरीर शुद्ध असून आपल्या परिसरात कोणतेही मास हारी वर्ज असावे या उद्दिष्टाने मांसाहारी दुकाने बंद ठेवण्यासाठी स्वराज्य संघटना चावणे यांच्या वतीने ग्रूप ग्राम पंचायत कराडे खुर्द यांस निवेदन देण्यात आले.
२९ तारेखेला आषाढी एकादशी येत असल्यामुळे हा दिवस म्हणजे महाराष्ट्रातील वारकरी आणी भक्तांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस असतो.गेले अनेक दिवस पायी चालत जावून मजळ - दरमजळ करीत ह्या पालख्या विठ्ठू रायाच्या चरणी नतमस्तक होत असतात.ज्या भक्तगणांना पंढरपुरात जाणे शक्य होत नाही ते आपल्या गावातील असलेल्या विठ्ठल रखुमाई चे दर्शन घेत असतात.शिवाय हा दिवस अत्यंत पवित्र असल्यामुळे अनेक जण उपवास करीत असतात.मात्र आश्या वेळी गावात मांसाहार विक्री होवू नये यासाठी स्वराज्य संघटना चावणे यांच्या माध्यमातून हे निवेदन देण्यात आले.
यावेळी हे निवेदन देण्यासाठी स्वराज्य अध्यक्ष महादेव कचरे,उपाध्यक्ष मोरे महाराज,चिटणीस योगेश पाटील,ॲड.संजय टेंबे,सदस्या नलिनी कारंडे,संघनिका मनीषा माने,त्याच बरोबर सरपंच यांनी सहकार्य करण्यांचे आश्वासन देण्यात आले.सरपंच भारती चितळे,उप सरपंच प्रमिला योगेश पाटील यांस या निवेदन दिल्यांची माहिती देण्यात आली.हा संपूर्ण दिवस मांसाहारी वर्ज कसे राहील यासाठी प्रयत्न केले जाईल. तश्या सुचनाही मांसाहारी विक्रितेना देण्यात आल्यांचे समजते.
0 Comments