होराळे गावातील विठू माऊलीच्या मंदीरात कृ.उ.बा.समितीचे सदस्य शांताराम पाटील यांनी केली सपत्नीक महापूजा

 

समाधान दिसले
खालापूर : २९ जून ,

 
                    वावोशी छत्तीशी विभागातील सर्वाचे श्रध्दास्थानी असलेल्या होराळे गावाच्या टेकडीवरील विठू माऊलीच्या मंदीरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे. सकाळी ७ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य शांताराम पाटील सपत्नीक महापूजा केली आहे.
           
       धाकटी पंढरीच्या नंतर वावोशी छत्तीशी विभागातील टेकडीवरील विठू माऊली मंदीर वारकऱ्यांच्या श्रध्दास्थानी असून रायगड भूषण ह.भ.प.रामदास महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंदीरात वर्षभर सर्व एकादशी निमित्ताने कार्यक्रम आयोजित केले जातात. उंच टेकडीवर असलेल्या विठू माऊलीच्या मंदीरातील वातावरण प्रसन्न असते.
       
        तर आषाढी एकादशी वारकऱ्यांसाठी पर्वणी असल्यामुळे पंढरपूर सह सर्वच विठ्ठल मंदीरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी होत असताना कृ.उ.बा.समितीचे सदस्य शांताराम पाटील आणि खरिवली ग्रामपंचायतीच्या सदस्या अंजना पाटील सपत्नीक महापूजा केली आहे. त्यानंतर छत्तीशी विभागातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. तसेच सकाळी १० वाजता भैरवनाथ भजनी मंडळ खरीवली यांनी सुश्राव्य भजन सादर केले असून मंदीरातील आयोजित कार्यक्रमाचे नियोजन परशुराम पाटील - गोठीवली, केशव बुरमकर - होराळ यांनी केले होते.

   
    चौकट -
          वावोशी छत्तीशी विभागातील सर्वाचे श्रध्दास्थानी असलेल्या होराळे गावाच्या टेकडीवरील विठू माऊली मंदीरात आषाढी एकादशी निमित्ताने महापूजेचा मान मिळाल्याबद्दल मंदिर व्यवस्थापनाचे आभार मानून विठू माऊलीची मनोभावे पूजाअर्चा करित सर्वाना सुखी ठेव असे साकडे घातले आहे. तसेच यावर्षी वरुण राजा चांगला बरसू दे आणि शेतकरी राजा सुखाऊ दे अशी प्रार्थना केली आहे.
        शांताराम पाटील 
    कृषी उत्पन्न बाजार-  सदस्य 

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण