रुद्रा शंभू ढोल ताशा पथक लव्हजी, यांच्या माध्यमातून धाकटी पंढरी साजगांव येथे चहा - पाण्यांची व्यवस्था

 


पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
साजगांव/ लव्हजी : २९ जून,

             संत तुकाराम महाराज यांच्या पद स्पर्शाने पावन झालेली धाकटी पंढरी साजगांव येथे आज आषाढी एकादशी च्या निमित्ताने हजारो भाविक भक्त वारकरी यांनी विठ्ठल रखुमाई यांचे दर्शन घेतले,पहाटे पासून या माऊली चे दर्शन घेण्यासाठी लांबच - लाब रांग लागल्यांची ह्या ठिकाणी पहावयास मिळाले, आज दिवस भर पाऊस पडत असल्यामुळे रुद्रा शंभू ढोल ताशा पथक लव्हजी यांच्या माध्यमातून चहा पाण्यांची व्यवस्था करण्यात आली.यावेळी प्रत्येक भाविक भक्तांस गरम चहा देण्यात आले.
                     सकाळ पासून पाऊस आणी त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होत असल्यामुळे शरीरात एक प्रकारची उर्जा निर्माण व्हावी शिवाय या उद्दात विचारांतून प्रत्येक वारकरी,भाविक भक्तांना आदाराने चहा,पाणी दिले जात होते.मुखात विठ्ठलाचे नाम आणी नामस्मरण करीत हे तरुण वर्ग पहाटे पासून चहा वाटपाचे काम करीत होते.प्रत्येकाला चहा मिळावा यासाठी त्यांचे सहकारी या ठिकाणी चहाची विनामूल्य व्यवस्था आहे असे प्रत्येकांस आवर्जून सांगत होते.
                    आषाढी एकादशी च्या निमित्ताने आपल्याला वारकरी यांची सेवा करण्याचा लाभ मिळाला ह्यांचे मनस्वी आनंद होत असल्यांचे रुद्रा शंभू ढोल ताशा पथक लव्हजी अध्यक्ष - रोहित पाटील,उपाध्यक्ष - प्रतिक पाटील,गणेश पाटील,सहकारी - ऋतिक पाटील,योगेश पाटील,जय,अभिषेक पाटील,कुणाल ठोंबरे,अनिकेत पाटील,चेतन पाटील,साई थरकुडे,अदित्य थरकुडे,निशांत कोंडे,दीपक फराट,सिद्धेश पाटील,गौरव पाटील, यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण