हनुमंत मोरे
वावोशी / खोपोली : ३० जून
२८ जून २०२३ रोजी मौजे तांबाटी,ता.खालापूर येथील ग्रामपंचायत हॉल येथे उपविभागीय कृषी अधिकारी खोपोली यांचे मार्गदर्शन खाली कृषी संजीवन सप्ताह आयोजित करण्यात आला होता.या निमित्ताने शेतकऱ्यांना जमीनीची सुपीकता,शेतकऱ्यांना माती नमुने कसे काढायचे,जमीनीतील सामु ,जमीनीतील सेंद्रीय कर्बाचे महत्व, माती परिक्षन अहवाल नंतर आरोग्य पत्रीके नुसार खंताचा वापर करणे इत्यादी बाबींचे मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी सुनील निंबाळकर यांनी केले.
या वेळी मंडळ कृषी अधिकारी खालापूर जे.के.देशमुख यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती दिली तसेच कृषी पर्यवेक्षक एस.टी.धुमाळ यांनी परीसरातील महीला बचत गटाच्या सदस्या,व इतर महीला व पुरुष शेतकरी यांना शेतीचे महत्व पटवून देत शेतमालाला बाजारपेठ कशी उपलब्ध करता येते याबाबत सविस्तर माहिती दिली.या कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी मोठ्या संखेने हजर होते. कार्यक्रमांमध्ये आत्मा अंतर्गत भाजीपाला मिनी किट चे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन कृषी सहाय्यक सागर माने व नितीन रांजुन यांनी केले . आभार प्रदर्शन तांबाटी ग्रामपंचायत च्या माजी सरपंच दळवी यांनी केले.
0 Comments