संजय कदम
पनवेल : ३० जून ,
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व युवासेना देवद शाखेच्या वतीने देवद येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीचे औचित्यसाधून तुळस रोपांचे वाटप करण्यात आले.
आरोग्यवर्धक, सुख शांती, आनंदी, प्रदूषणनाशक अशी तुळशीची ओळख आहे. तसेच हिंदू धर्मात तसेच आयुर्वेदामध्ये तुळशीचे मोठे योगदान आहे. याचे महत्त्व लक्षात घेऊन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व युवासेना देवद शाखेच्या वतीने १२० तुळशींच्या रोपांचे वाटप भाविकांना करण्यात आले. यावेळी उपविभाग प्रमुख जयंत पाखरे, विभाग प्रमुख विशाल भोईर, सुकापूर शाखाप्रमुख हनुमंत खंडागळे, युवासेनेचे सुमित कदम, सिध्देश चव्हाण, सुरेश माने, राजेश वायरे, हेमंत म्हात्रे आदी उपस्थित होते.
0 Comments