आषाढी एकादशी निमित्त पीएनपी शाळेतील विद्यार्थ्यांची वारकऱ्यांच्या वेशात प्रभात फेरी

 


 हनुमंत मोरे
वावोशी / खोपोली : ३० जून 

खालापूर तालुक्यातील वावोशी फाटा येथील पीएनपी शाळेत आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेषभूषेतून बाजारपेठेतील रस्त्याने काढलेली प्रभात फेरी लोकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.त्यासोबत विद्यार्थ्यांनी विठुरायाची पालखी काढून बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना आपल्या दुकानासमोर विठ्ठलाचे दर्शन दिल्याने अनेक भाविकांसह व्यापाऱ्यांनी या पालखीचे दर्शन घेऊन स्वागत केले. 

                विद्यार्थ्यांनी विठुरायाची काढलेली पालखी पाहून अनेकांनी विद्यार्थ्यांचे गोड कौतुक केले.
मागील काही वर्षापासून वावोशी फाटा येथे असलेली पीएनपी शाळा सांस्कृतिक,सामाजिक तसेच विविध शैक्षणिक अभ्यासक्रमाची सांगड घालून विद्यार्थ्यांना आपल्या रूढी परंपरेचे ज्ञान अवगत करून देत आहे. हे ज्ञान देत असताना शाळेने आपल्या संस्कृतीची घातलेली सांगड विद्यार्थ्यांंसाठी प्रेरणादायी ठरताना दिसत आहे.
               

   या शाळेत असलेल्या विविध जाती धर्माच्या विद्यार्थ्यांनी आज एकादशी निमित्त वारकऱ्यांचा वेश परिधान करून विठुरायाची काढलेली पालखी सोबत ठीक ठिकाणी उभे केलेले रिंगण,टाळाचा नाद,भजनाचा सूर हे पाहून अनेकांना या गोष्टीचे आश्चर्य तर वाटलेच त्याच सोबत भाविकांना वारीचा आनंद झाल्याचे पाहायला मिळाले.

                 या प्रभातफेरीत शाळेच्या मुख्याध्यापिका पूनम फुलारे,सोनाली जाधव,रुपाली चौधरी,वैशाली चव्हाण,हर्षाला शहासने,नेहा पाटील,रोजलिया कुजूर, सायली कदम,समृद्धी पोटे,आईनकर सर तसेच
पालक वर्ग आणि व्यवस्थापन कमेटीचे अध्यक्ष,अशोक पाटील,उपाध्यक्ष प्रमोद जाधव,शांताराम परशुराम पाटील,चंद्रकात बाळकृष्ण पाटील,रामचंद्र शंकर बांदल,परशुराम धर्मा पाटील व शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.


चौकट 

विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमा सोबत सांस्कृतिक व अध्यात्मिक ज्ञान अवगत असले पाहिजे,आपल्या संस्कृतीचे पुढे जतन झाले पाहिजे यासाठी दर वर्षी पीएनपी शाळा वर्षभर साजरे होणाऱ्या सन,उत्सवांची माहिती विद्यार्थ्यांना देत त्यामागील कारणही सांगितले जाते.आज आषाढी एकादशी निमित्त आम्ही विद्यार्थ्यांना जगातील सर्वश्रेष्ठ ठरलेल्या वइठूरआयच्यआ भक्तांची किमया समजावून सांगितली.लाखो भक्त एका तालासुरात कसे भक्तिमय वातावरणात विलीन होतात त्यांची महती काय हे आमच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने काढलेल्या दिंडीतून दिसून आली.

पुनम फुलारे
मुख्याध्यापिका पीएनपी शाळा वावोशी.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर