कामोठे येथे वीरशैव कक्कया (ढोर) समाज मंडळाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन

 


संजय कदम                                                          पनवेल : ३० जून 


              महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव सूरदास गोवारी आणि ककय्या समाज बांधवांच्या साक्षीने वीरशैव कक्कया (ढोर) समाज मंडळ, कामोठे सेक्टर ८ येथील नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
            यावेळी उत्तम गायकवाड, अजिनाथ सावंत, चंद्रकांत नवले, नागेश पवार, संकेत बढे व सुनील नांगरे तसेच कार्यक्रमावेळी कार्यकारिणी सदस्य व मोठ्या संख्येने समाज बंधू भगिनी देखील उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी या नवीन कार्यालयास व वीरशैव कक्कया (ढोर) समाज मंडळ, कामोठे समिती पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. कामोठे मंडळाचे अध्यक्ष मल्हारी सदाफुले यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर