महिला,पुरुष वर्गांसाठी भरली शेती शाळा,पानशिल,तळेगांव येथे परसबाग किट वाटप,विविध योजनांची कृषि पर्यवेक्षक नितिन महाडिक यांने केले मार्गदर्शन

 


पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
पानशिल,तळेगांव  : ५ जुलै,
          
              महाराष्ट्र शासन कृषि विभाग संपूर्ण राज्यभरात कृषि संजीवनी सप्ताह आयोजित केला जात असल्यामुळे त्या अनुषंगाने खालापूर तालुक्यात तालुका कृषि अधिकारी कार्यालयामार्फत तळेगाव व पानशिल येथे कार्यक्रम घेण्यात आला.यानिमित्ताने कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण राबविण्यात आले.                                                                 

   यावेळी ग्रामीण भागात शेताच्या बांधावर किंवा ओसाड माळरानावर पावसाळी महिला वर्ग भाजी,कंदमुळे लागवड करीत असतात.मात्र काहिना जागेचा आभावामुळे लागवड करु शकत नाही.यामुळे नाईलाजाने बाजारपेठ उपलब्ध होत असलेली भाजी खरेदी करावी लागते.मात्र आपल्या जेवणात ताजी भाजी उपलब्ध व्हावी या दृष्टीकोणातून पानशिल  या गावातील महिला वर्गांसाठी माझी परसबाग ही मोहीम राबविण्यात आली. 
                     या कार्यक्रमास कृषि पर्यवेक्षक नितिन महाडिक  यांनी शेतकऱ्यांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, फळबाग लागवड, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, आंतरपीक पद्धती मधे भाजीपाला लागवड, तसेच महाडिबीटी ( यांत्रिकीकरण )अंतर्गत विविध योजना, इ. बाबत मार्गदर्शन केले.   
                  तसेच कृषि सहायक चौधरी  यांनी खरीप पीक विमा योजना, आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष निमित्त आहारातील तृण धान्यांचे महत्त्व, तसेच तृणधान्य वर्गीय पिकांची लागवड इ बाबत मार्गदर्शन केले.यावेळी शेतकऱ्यांना आत्मा अंतर्गत परसबागेतील भाजीपाला बियाण्यांचे वाटप करण्यात आले. कृषि सहायक फराटे यांचीही शेतकऱ्यांस मार्गदर्शन लाभले.
               

 आपण परस बाग  आपल्या घरासमोर किंवा घराच्या बाजूला  भाजी लागवड करु शकतो.यामुळे आपल्या आहारात ताजी भाजी मिळणे शक्य होत असते.यासाठी थोडीशी मेहनत घेतल्यास आपणांस मोठ्याप्रमाणावर भाजी मिळत असते.यावेळी बियाणे लागवड पासून ते फळ येण्यापर्यंत काळजी कशी घ्यावी यांचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी मिरची, काकडी, वांग, दुधी, कारले अदिचे मिनी किट बियाणे मोफत वाटप करण्यात आले.यावेळी महिला वर्गांचा मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद मिळाला.

Post a Comment

0 Comments

विकास कामाच्या जोरावर महेश बालदि पुन्हा आमदार होणार मा.सरपंच माजगांव- गोपीनाथ जाधव