संजय कदम पनवेल : ६ जुलै,
गावाच्या सुरक्षेसाठी पोलीस पाटील, सरपंच, महिला दक्षता समिती सदस्यांनी दक्ष राहावे असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील पोलिस पाटील, सरपंच, महिला दक्षता समिती सदस्य यांच्या समन्वय बैठकित केले. पनवेल विभाग सहा. पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांचे मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाणे, मंथन हॉल येथे घेण्यात आलेल्या या बैठकीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील उपस्थित होते. या बैठकीत सध्याचे राजकिय परिस्थिती, येणारा पावसाळा, धरणे, धबधबे, ईत्यादी ठिकाणी सुरक्षेच्या अनुषंगाने तसेच लोकसहभागातून हद्दीत सीसीटीव्ही कॅमेरे बसून गावाची सुरक्षेच्या दृष्टीने सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी उपस्थितांना सूचना केल्या. या बैठकीत सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी जेष्ठ नागरीक, महिला व लहान मुले यांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच कायदा व सुव्यवस्थेचा दृष्टीने लोक सहभागातून जास्तीत जास्त CCTV कॅमेरे बनविणे, सध्याचे राजकीय परिस्थिती च्या अनुषंगाने गावातील विशेष घटना या बाबत माहिती देणे, ग्रामीण भागात गावठी दारू, अवैध धंदे, ईत्यादी माहिती देणे तसेच सोसायटी मध्ये भाडेकरू राहत असतील त्यांची माहिती ऑनलाईन पद्धतीने देणेबाबत सूचना केल्या आहेत त्याचप्रमाणे सध्याचे पावसाळी वातावरण असल्याने पाणी थांबणारे ठिकाणे, धबधबे, धरणे, ईत्यादी ठिकाणी पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. त्याचे सुरक्षाच्या अनुषंगाने पोलीस ठाणे कडून मनाई आदेश फलक प्रसारीत केला आहे. तसेच दरड कोसळणारे ठिकाणाची माहिती , पाणी साचणारे ठिकाण व त्यातून जीवित हानी होऊ नये याकरिता पोलीस पाटील/ सरपंच यांना योग्य त्या सूचना दिलेले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ पोलीस मदतीकरीता DIAL 112 या क्रमांकावर संपर्क करण्यात यावा. तसेच प्रत्येक गावातील कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे प्रश्न असल्यास फोन द्वारे किंवा पोलीस पाटील यांच्या ग्रुप वर शेअर करावा बाबत माहिती दिलेली आहे. येणारे सण उत्सव , संशयित इसम, बेवारस वाहन, संशयित वस्तू, ईत्यादी माहिती देण्याबाबत योग्य त्या सूचना सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी उपस्थितांना केल्या. या बैठकीला पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगदीश शेलकर , गोपनीय विभागाचे कुंवर, पंकज शिंदे व होलकर यांच्यासह पोलिस पाटील, सरपंच, महिला दक्षता समिती सदस्य उपस्थित होते.
0 Comments