अंजरुण गावातील श्री भैरवनाथ मंदिरात ११११ दिव्याच्या आरासाने लखलखात - सोमवती अमावस्या निमित्त दिप महोत्सव साजरा
समाधान दिसले
खालापूर : १८ जुलै,
सोमवती अमावस्या निमित्त अनेक कार्यक्रम साजरे होत असताना १७ जुलैसोमवती रोजी अंजरुण गावातील श्री भैरवनाथ मंदिरात ही अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी मंदिरात ११११ दिव्याची आरास करून दिप महोत्सव साजरा करण्यात आल्याने अंजरुण गावातील तरुण - महिला व ग्रामस्थ वर्गात नवचैत्यन पसरले होते.
सोमवती अमावस्येला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व असल्याने या दिवशी शिव आणि पितरांची पूजा केल्याने अनेकविध लाभ होतात. सुहासनी स्त्रिया या दिवशी शिवपार्वतीची पूजा करून अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात आणि सोमवती देवीकडे सौभाग्य टिकून राहण्यासाठी तसेच सुख शांती आनंद कायम राहावा याकरीता आशीर्वाद मागत असल्याने सर्व ठिकाणी
तर हा सोहळा बाळ योगी गंगानाथ महाराज यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. खालापूर तालुक्यातील बहुतांश गावात १७ जुलै रोजी सोमवती अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असताना ग्रामीण अंजरुण गावातही मोठ्या भक्तीभावाने सोमवती अमावस्या गावातील तरुण - महिला व ग्रामस्थ वर्गानी श्री भैरवनाथ मंदिरात साजरी करून गावातील एकीचे दर्शन घडवले.
यावेळी मंदिरात ११११ दिव्याची आरास केल्याने मंदिर परिसर दिव्याच्या प्रकाशाने उजलून गेला होता, त्यामूळे सर्व अंजरुण वासीय आनंदीत झाल्याचे पाहायला मिळाले असुन यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत महाआरतीने या सोहळ्याची सांगता करण्यात आली.
0 Comments