आम.अदिती तटकरे नामदार झाल्यामुळे रखडलेल्या विकासाला चालना मिळेल.... अंकित साखरे
हनुमंत मोरे
खोपोली /वावोशी : १८ जुलै,
महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात रायगडची कन्या कुमारी आदितीताई तटकरे यांची नामदार म्हणून वर्णी लागली आहे,त्यांच्या या वर्णीमुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. मध्यंतरीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधी पक्षात असल्यामुळे रखडलेला विकास आणि खुंटलेली विकास कामे यांना आता नव्या जोमाने चालना मिळाल्याशिवाय राहणार नाही.
अदितीताई तटकरे नामदार झाल्यामुळे आम्हाला आता त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री होतील अशी अपेक्षा वाटत आहे.मात्र राज्यात तीन वेगवेगळ्या पक्षांचे सरकार सत्तेत असल्यामुळे हे सरकार सुरळीत चालण्यासाठी तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हा कार्यकर्त्यांना मान्य असेल असेही अंकित साखरे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
ते पुढे असे म्हणाले की आम्ही रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते खासदार सुनील तटकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत आणि भविष्यातही राहणार! सध्या पक्षाचे दोन गट जरी पाहायला मिळत असले तरी रायगड जिल्ह्यातील युवक काँग्रेस कार्यकर्त्यांची संपूर्ण फळी ही खासदार सुनील तटकरे यांच्या पाठीमागे आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या
मागे खंबीरपणे उभी राहिलेली पाहायला मिळत आह.मी युवक काँग्रेस रायगड जिल्हा अध्यक्ष या नात्याने आपणास आश्वासित करतो की राज्याच्या मंत्रिमंडळात नामदार झालेल्या अदितीताई तटकरे ह्या जिल्ह्यातील खुंटलेल्या विकासाला नक्कीच चालना देतील, परंतु आम्हाला सुध्दा आपला खुंटलेल्या विकास करतांना राजकारण आडवे आणायला आवडणार नाही.रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी तिन्ही पक्षाचे नेते जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मान्य राहील असेही अंकित साखरे यांनी सांगितले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका मध्ये आघाडी होण्याची शक्यता आहे त्यामुळे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्या निर्णयानुसार आम्ही आघाडीच्या उमेदवाराचे जोमाने काम करून त्यास विजयी करू असेही त्यांनी सांगितले.
_____अंकित साखरे यांच्या फेर निवडी बद्दल अभिनंदन ----
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हा युवकांची जबाबदारी मागील पाच वर्ष यशस्वीपणे सांभाळणाऱ्या अंकित साखरे यांच्या खांद्यावर पुन्हा एकदा तोच विश्वास व्यक्त करून पक्षाने त्यांना रायगड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्षपदाची माळ गळ्यात घातली आहे.अंकित साखरे यांची पक्षाप्रति व आपल्या नेतृत्वावर असलेला विश्वासच त्यांच्या प्रगतीचे खरे गमक असल्याचे दिसून येत आहे.त्यांची पुन्हा एकदा रायगड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्याने दैनिक नवराष्ट्र चे रायगड जिल्हा जाहिरात प्रतिनिधी मुकुंद बेंबडे, खालापूर तालुका प्रतिनिधी हनुमंत मोरे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments